IMPIMP

Shivsena | किती आले, किती गेले, तरी देखील शिवसेना मजबूत, ‘मशाल’ चिन्ह मिळाल्यावर उद्धव ठाकरे गटाचा जल्लोष

by nagesh
Samata Party | Samata Party's objection to Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray group's symbol 'Mashal'

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन जून महिन्यात शिवसेना (Shivsena) पक्षात मोठा विद्रोह झाला. यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात पक्षाच्या 40 पेक्षा जास्त आमदारांनी, 12 खासदारांनी आणि असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. यावेळी शिवसेनेने (Shivsena) बंड केलेल्या पहिल्या तुकडीतील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली. त्यानंतर जसजशी शिंदे यांच्या तंबुतील आमदारांची आणि खासदारांची संख्या वाढत गेली, तसे त्यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावरच दावा ठोकला आणि सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) गाठले. शिवसेनेने देखील कायदेशीर लढा दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पक्षाच्या नावावर आणि चिन्हाच्या वादावर निर्णय घेण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला (Election Commission of India) दिली होती. त्यातच अंधेरी येथे पोटनिवडणुकीच्या (Andheri By-Election) पार्श्वभूमीवर आयोगाने हंगामी निर्णय जाहीर केला. शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि अधिकृत निवडणूक चिन्ह यावेळी गोठविण्यात आले. त्यामुळे  उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना पक्षाला नवे नाव आणि चिन्हाचे काही पर्याय देण्यात आले.

 

त्यात उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले. उद्धव ठाकरे यांना मशाल (Mashal) चिन्ह मिळाले आहे.
त्यामुळे राज्यभरात त्यांच्या मशाल (Mashal) या चिन्हाचा जोरदार प्रचार सुरु झाला असून,
उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरु केला आहे.

 

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर रत्नागिरी (Ratnagiri) येखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थकांनी साळवी स्टॉप या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल चिन्हाचे जोरदार स्वागत केले.
यावेळी शहरभरात पक्षाच्या नवीन नावाचे आणि चिन्हाचे पोस्टर झळकविण्यात आले.
आता नव्याने पक्षाचे नाव आणि चिन्ह तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप साळवी (Pradeep Salavi) यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
यावेळी शिवसेना कोणीही संपवू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया देखील कार्यकर्त्यांनी दिली.
शिवसेना पक्ष आजपर्यंत कोणी संपवू शकला नाही.
किती आले, किती गेले, तरी देखील आजपर्यंत पक्ष मजबूत आहे,
अशी एकंदरीत शिवसेनेच्या ठाकरे गटाची प्रतिक्रिया आहे.

 

Web Title :- Shivsena | Shiv Sena is strong no matter how much it has come and gone

 

हे देखील वाचा :

Abdul Sattar | बाळासाहेबांचे नाव मिळाले ही मोठी आनंदाची गोष्ट – अब्दुल सत्तार

Balasahebanchi Shivsena | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला (शिंदे गट) मिळाले निवडणूक चिन्ह

Pune NCP News | रमाबाई आंबेडकर नगर (ताडीवाला रोड) येथे राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियानास नागरिकांचा चांगला प्रतिसाद

 

Related Posts