IMPIMP

Abdul Sattar | बाळासाहेबांचे नाव मिळाले ही मोठी आनंदाची गोष्ट – अब्दुल सत्तार

by nagesh
Abdul Sattar On Thackeray Group | abdul sattar slams thackeray group over controversial statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना (Shivsena) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वादावर काही काळासाठी आता पडदा पडला आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) निवडणूक आयोगाने गोठविले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आणि एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) असे ठेवले आहे, तर शिंदे यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Shivsena of Balasaheb) असे नाव जाहीर केले. त्यावर शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी भाष्य केले आहे. शिवसेनेचे चिन्ह आम्हाला मिळू शकले नाही, पण बाळासाहेब ठाकरेंचे नाव मिळाले, त्याचा आनंद आहे, असे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या गटाला नाव दिल्यानंतर त्यांच्या गटातील आमदार आणि मंत्र्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. चिन्ह मिळाले नसले तरी बाळासाहेबांचे नाव मिळाले याचा आम्हाला आनंद आहे. तसेच निवडणूक आयोगाला देखील कळाले आहे, की खरी शिवसेना कोणाची? असे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या नावाची शिवसेना काढली आहे. ती पुढे किती दिवस चालेल, माहीत नाही.
आगामी निवडणुकांत त्यांना जनतेचा किती पाठिंबा आहे, ते कळेलच, असे देखील सत्तार यावेळी म्हणाले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध ठिकाणी दौऱ्यांवर जातात.
यावेळी सामान्य लोक तासंतास त्यांची प्रतीक्षा करतात.
त्यावरुन त्यांची लोकप्रियता जनतेला कळते आहे.
तसेच सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज मुख्यमंत्री झाला आहे, याची जाणीव आणि आनंद जनतेला आहे,
असे देखील अब्दुल सत्तार म्हणाले.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Abdul Sattar | It is a matter of great joy to get the name of Balasaheb – Abdul Sattar

 

हे देखील वाचा :

Balasahebanchi Shivsena | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला (शिंदे गट) मिळाले निवडणूक चिन्ह

Pune NCP News | रमाबाई आंबेडकर नगर (ताडीवाला रोड) येथे राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियानास नागरिकांचा चांगला प्रतिसाद

Pravin Darekar | मराठा समाजाच्या प्रश्नावर आमचे सरकार सकारात्मक – आमदार प्रवीण दरेकर

 

Related Posts