IMPIMP

Pune Traffic Updates News | शिवाजीनगर बस स्थानकाला लागून असलेला आकाशवाणी चौक ते दळवी हॉस्पिटल चौक रस्ता वाहतुकीसाठी खुला

by nagesh
 Pune Traffic Updates News | Order issued to stop traffic on Waghapur to Shindwane route; Citizens are urged to use alternative routes

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Traffic Updates News | पुणे मेट्रोचे (Pune Metro) बांधकाम करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेट टाकून काही रस्ते बंद करण्यात आले होते. बॅरिकेट मुळे वाहतुकीला अडथळा (Pune Traffic Updates News) होत असल्याने काम संपेल तसे बॅरिकेट काढून रस्ता मोकळा करण्याचे धोरण मेट्रोने सुरुवातीपासून अवलंबले आहे. शिवाजीनगर बस स्थानकाला (Shivaji Nagar ST Stand) लागून असलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर चौक (आकाशवाणी चौक-Akashvani Chowk) ते दळवी हॉस्पिटल हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फुगेवाडी मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक तसेच गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक (Garware College Metro Station) ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक (Civil Court Interchange Metro Station) आणि सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक ते रूबी हॉल मेट्रो स्थानक (Ruby Hall Metro Station) या मार्गांचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील (Pune Traffic Updates News) बॅरिकेट काढून रस्त्यांची रुंदी पूर्ववत करण्यात आली आहे.

 

शिवाजीनगर बस स्थानकाला लागून असलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर चौक (आकाशवाणी चौक) ते
दळवी हॉस्पिटल हा रस्ता शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकाच्या बांधकामासाठी बंद करण्यात आला होता.
शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकाचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे.
त्यामुळे मातोश्री रमाबाई आांबेडकर चौक (आकाशवाणी चौक) ते दळवी हॉस्पिटल
या रस्त्याचे नावीन काँक्रीटीकरण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
ह्या रस्त्याची लांबी 174 मीटर आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक नियमित सुरु झाली आहे.

 

Web Title :- Pune Traffic Updates News | Akashvani Chowk to Dalvi Hospital Chowk road adjacent to Shivajinagar Bus Station is open for traffic

 

हे देखील वाचा :

Pune MahaVitaran News | आकुर्डीमध्ये महावितरणचा आकडेबहाद्दरांना दणका ! तब्बल चौदाशे वीजचोऱ्या उघड; नवीन वीजजोडणीसाठी रिघ

CM Eknath Shinde On Maratha Reservation | मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Influenza Virus | इन्फल्युएंझा आजाराच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून आढावा

 

Related Posts