IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | आगामी निवडणुका मनसे कशी लढणार? युती की स्वबळ? राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

by nagesh
Raj Thackeray | raj thackeray comment on vedant marathe veer daudale saat move in kudal

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी घेतला आहे. मनसेच्या पदाधिकार्‍यांची आज रंगशारदा येथे बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मार्गदर्शन करताना हा निर्णय जाहीर केला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले, निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा आणि कामाला लागा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या बैठकीत मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले, राज्यातील सध्याच्या राजकारणाला जनता वैतागली आहे. अनेक लोकांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दसरा मेळावा (Dasara Melava 2022) पाहिलेला देखील नाही. सत्ता आली तर मी तुम्हालाच सत्तेवर बसवेन. मी सत्तेत बसणार नाही.

 

राज ठाकरे म्हणाले, सध्या जनतेमध्ये मनसेबाबत सकारात्मक वातावरण आहे.
येत्या दिवाळीमध्ये लोकांमध्ये मिसळा, मनसेचा प्रचार करा तुम्ही काम करा विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी माझी आहे.

 

बैठकीबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी सांगितले की,
आज मनसेची अत्यंत महत्त्वाची बैठक होती. तिला विविध शहरातील पदाधिकारी आले होते.
या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना अत्यंत सकारात्मक असा संदेश दिला आहे.
स्वत:च मत सकारात्मक बनवून निवडणुकीला सामोरे जायचे आहे.
त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात जो काही चिखल तयार झाला आहे.
त्यामुळे जनता कंटाळली आहे, तसेच मनसेकडून अपेक्षा वाढली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | alliance or independence mns chief raj thackeray has taken a big decision regarding the upcoming elections and has given orders

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वाढदिवस ठरला आयुष्याचा शेवटचा दिवस! लोखंडी रॉड डोक्यात पडून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Shivsena | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ मधील बाळासाहेब कोण?, किशोरी पेडणेकरांचा सवाल

Eknath Khadse | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ मधील बाळासाहेब म्हणजे संघाची स्थापना करणारे बाळासाहेब उरुस, एकनाथ खडसेंनी सांगितला योगायोग

 

Related Posts