IMPIMP

Pune Crime | वाढदिवस ठरला आयुष्याचा शेवटचा दिवस! लोखंडी रॉड डोक्यात पडून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

by nagesh
Pune Crime | knife attack on pan stall owner in kondhwa

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत लोखंडी रॉड उडून तीन वर्षीय चिमुरड्याच्या डोक्यात पडल्यामुळे
झालेल्या अपघातात कुटुंबीयांसमवेत चाललेल्या तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू (Little Boy Death) झाला. वाढदिवशीच (Birthday) चिमुरड्यावर
काळाने घाला घातल्यामुळे गावकरी हळहळले आहेत. ही घटना (Pune Crime) 9 ऑक्टोबरला बारामतीत (Baramati) इंदापूर रोडवरील (Indapur
Road) हॉटेल शिवमसमोर घडली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अरहत थोरात (Arhat Thorat) असे अपघातात (Road Accident) ठार झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संकेत प्रकाश खळदकर Sanket Prakash Khaldkar (रा. नानगाव, ता. दौड) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शुभांगी कांबळे (Shubhangi Kamble) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

मुलगा अरहत याचा वाढदिवस साजरा करून आई प्रिती प्रमोद थोरात Priti Pramod Thorat (रा. मळद, ता. बारामती) इतर नातलगांसोबत 9 ऑक्टोबरला रात्री साडेनऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे मेळावा पाहण्यासाठी निघाले होते. एसटी स्टँड चौक ओलांडून इंदापूर रोडने जय शिवम हॉटेलसमोरून पुढे चालत निघाल्या होत्या. त्यावेळी अचानक भरधाव वेगाने मोटारसायकलस्वार लोखंडी अँगलला धडकला. त्यामुळे लोखंडी अँगल फिर्यादीच्या पायाला आणि अरहतच्या डोक्याला लागला. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

 

Web Title :- Pune Crime | Birthday is the last day of life! Unfortunate death of a child due to an iron rod falling on his head

 

हे देखील वाचा :

Shivsena | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ मधील बाळासाहेब कोण?, किशोरी पेडणेकरांचा सवाल

Eknath Khadse | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ मधील बाळासाहेब म्हणजे संघाची स्थापना करणारे बाळासाहेब उरुस, एकनाथ खडसेंनी सांगितला योगायोग

Arjun Khotkar | ‘आपलं ठेवायचं झाकूण आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून’ अशी सवय गोरंट्याल यांना आहे; अब्दुल सत्तार यांच्यावरील टीकेवर अर्जुन खोतकर यांचे प्रत्युत्तर

 

Related Posts