IMPIMP

Eknath Khadse | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ मधील बाळासाहेब म्हणजे संघाची स्थापना करणारे बाळासाहेब उरुस, एकनाथ खडसेंनी सांगितला योगायोग

by nagesh
Eknath Khadse | Finally, a case of embezzlement of Jalgaon district milk union was registered; Eknath Khadse's big allegations against the police

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ (Shivsena – Uddhav Balasaheb Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’, असे नाव निश्चित केले आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचा गट शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Shivsena of Balasaheb) असे नाव मिळाले आहे. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेत महत्वाची भूमिका बजाविणारे बाळासाहेब उरुस (Balasaheb Urus) यांच्या नावाचा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा मोठा योग जुळून आला आहे, असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेतील बंडखोरी (Rebellion) आणि त्यावर सुरु असलेले राजकारण सध्या महाराष्ट्रासाठी चर्चेचा विषय झाला आहे.
नुकताच निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा ऐतिहासिक निर्णय देत, शिवसेना आणि बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांना मोठा दणका दिला आहे.
शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) कायमस्वरुपी गोठविण्यात आले आहे.
त्यामुळे दोनही गटांना आता नवीन पक्षाचे नाव आणि चिन्ह निवडावे लागले आहे.

 

त्यामुळे बाळासांहेबांची शिवसेना म्हणजे संघाची सेना, असा अर्थ योगायोगाने याठिकाणी निघतो,
असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले.
त्यामुळे संघाने प्रेरीत केलेली सेना, असे म्हणत एखनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप (BJP) यांना टोला लगावला आहे.

 

एकनाथ खडसे सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत.
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस पिकावर ‘लाल्या’ नावाच्या नव्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे समोर आले आहे.
शेतकऱ्यांना यापूर्वीची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसून, त्यांना आता तरी योग्य नुकसान भरपाई द्यावी,
अशी मागणी खडसे यांनी केली.

 

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची लवकरात लवकर पाहणी करुन पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना
नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Eknath Khadse | Balasaheb in ‘Balasaheb’s Shiv Sena’ means Balasaheb Urus who founded the Sangh, a coincidence told by Eknath Khadse

 

हे देखील वाचा :

Arjun Khotkar | ‘आपलं ठेवायचं झाकूण आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून’ अशी सवय गोरंट्याल यांना आहे; अब्दुल सत्तार यांच्यावरील टीकेवर अर्जुन खोतकर यांचे प्रत्युत्तर

Shivsena | तुमच्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील! शिवसेनेने व्यक्त केला शिंदे गटावर संताप, म्हटले – ही अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद

Manisha Kayande | निवडणूक आयोगाच्या निर्णयात विरोधाभास आणि चमत्कारीकपणा – शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे

 

Related Posts