IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | भाजपची मनसेला युतीची ऑफर, राज ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले…

MNS Chief Raj Thackeray | bjps offer to mns raj thackerays suggestive statement what happened in the mns office bearers meeting

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी त्यांनी युतीबाबत भाष्य केलं आहे. भाजपकडून युतीची (BJP-MNS Alliance) ऑफर आलेली आहे. मात्र, अद्याप आपण कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती मिळत आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मनसेच्या बैठकीमध्ये लोकसभा-विधानसभा निवडणुकी (Assembly Election) बाबत चर्चा झाली. त्यात लोकसभा निहाय मतदारसंघात मनसेची टीम जाणार, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार त्यानंतर पुढील कार्यक्रम हाती घेणार असल्याचे बैठकीत ठरले. मनसे-भाजपा-शिंदे गटासोबत (Shinde Group) युतीत जाणार अशी चर्चा सुरु आहे. त्यावरही राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना थेट सांगितले की, भाजपकडून आपल्याला ऑफर आहे. परंतु मी त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि नुकतेच युतीत सामील झालेले अजित पवार (Ajit Pawar) यांचे भाजप काय करणार, पुढचे गणित कसं जुळवणार याची स्पष्टता नाही. त्यामुळे मी अजून निर्णय घेतला नाही. युतीबाबत तुम्ही चर्चा करु नका. सध्या पक्ष वाढवणे हे महत्त्वाचे असल्याचे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

शरद पवार-अजित पवार गुप्त बैठकीवर भाष्य

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त बैठकीबाबत (Secret Meeting) बोलताना राज ठाकरे म्हणाले, एक टीम आधी पाठवली दुसरी पण लवकरच जाईल. अजित पवार आणि शरद पवार यांना भेटण्याची जागा ‘चोर’डीया यांच्या घरीच मिळाली हे कमाल आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

महापालिका निवडणुका होणार नाहीत

महाराष्ट्रात सध्या जो राजकीय घोळ झालाय त्यावरुन वाटत नाही पालिका निवडणुका (Municipal Election)
आता लागतील असे वातावरण सध्या दिसत नाही. परंतु आता निवडणुका लोकसभेच्या लागतील.
त्यासाठी आम्ही चाचपणी आणि तयारी सुरु केली आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
तसेच पदाधिकाऱ्यांना लोकसभेच्या तयारील लागण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

Web Title : MNS Chief Raj Thackeray | bjps offer to mns raj thackerays suggestive statement what
happened in the mns office bearers meeting