IMPIMP

Maharashtra Police | देशातील 140 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट तपसासाठी ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहिर, महाराष्ट्र पोलिसांना एकही पदक नाही

by sachinsitapure
Maharashtra Police | police medal for excellence in investigation does not have any medals center announced list

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Police | तपास कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 2023 या वर्षासाठी केंद्रीय गृहमंत्री पदकाने (Union Home Minister Medal) देशातील 140 पोलीस अधिकारी (Police Officers), कर्मचारी (Employees) यांना सन्मानित करण्यात येणार आहे. मात्र यंदा महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) एकाही अधिकारी, कर्मचाऱ्याला हे पदक मिळाले नाही. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) देखील पदक मिळालेले नाही.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

गुन्ह्याच्या तपासातील उच्च व्यावसायिक मानकांना प्रोत्साहन मिळावे तसेच तपास कार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी 2018 पासून दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी पदकांची घोषणा केली जाते. महाराष्ट्राच्या तुलनेत लहान राज्यांना यंदाच्यावर्षी पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, महाराष्ट्राला एकही पदक मिळालेले नाही. यावर्षी सर्वाधिक 15 पदकं सीबीआयला (CBI) तर 12 पदके राष्ट्रीय तपास यंत्रणेला (National Investigation Agency (NIA) मिळाली आहेत.

गेल्या वर्षी महाराष्ट्र पोलीस दलाला (Maharashtra Police) 11 पदकं मिळाली होती. मात्र, यंदा एकही पदक मिळालेलं नाही. यंदा 140 पदकं विविध विभागातील अधिकारी यांना मिळाली आहेत. मात्र, यात महाराष्ट्रातील एकाही अधिकाऱ्याचे नाव नाही.

2023 साठी ‘केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्टता तपासासाठी’
(Union Home Minister Medal for Excellence in Investigation) 140 पोलीस कर्मचाऱ्यांची यादी जाहीर
करण्यात आली आहेत. यामध्ये 15 सीबीआय, 12 एनआयए, 10 उत्तर प्रदेश, 9 केरळ आणि राज्यस्थान, 8 तामिळनाडू,
7 मध्य प्रदेश आणि 6 गुजरात, उर्वरित इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यामध्ये 22 महिला पोलीस
अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title : Maharashtra Police | police medal for excellence in investigation does not have any medals center announced list

Related Posts