IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | raj thackeray is visiting pune for the first time after issuing a leaflet for office bearers

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी एका व्याख्यानमालेत सहभागी होणार आहेत. तसेच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) बैठक घेणार आहेत. आगामी निवडणुका आणि पक्षबांधणीसाठी राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोकण, विदर्भ दौरा केला होता. त्यानंतर आता ते पुणे दौऱ्यावर असणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आज पुण्यातील तीन पदाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. पुण्यातील मनसे (Pune MNS) मध्ये मागील काही दिवसांपासून अंतर्गत वाद सुरु आहेत. यामुळे फूट पडली आहे. यासंदर्भात राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?

पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) हे पक्षाच्या निर्णयावर नाराज असल्याचे चित्र पहायला मिळत
आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी दोन वेळा वसंत मोरे यांना राज ठाकरे यांनी चर्चेसाठी बोलावून घेतले होते.
परंतु त्यांची नाराजी कायम होती. यानंतर मनसे युवानेते अमित ठाकरे (Amit Thackeray) पुणे दौऱ्यावर आले
होते. त्यांनी देखील वसंत मोरे यांना भेटीसाठी बोलवून घेतले होते.
आता राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून वसंत मोरे आणि राज ठाकरेंची भेट होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | raj thackeray is visiting pune for the first time after issuing a leaflet for office bearers

 

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | अखेर अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाने फेटाळली CBI ची ‘ती’ विनंती

Kajal Aggarwal | अभिनेत्री काजल अग्रवालच्या ‘त्या’ फोटोमुळे प्रेकक्षक संतापले ; “आमचं तू मन दुखावलं…”

Devendra Fadnavis | प्रलंबित राहिलेल्या ‘त्या’ 111 जणांना MPSC मार्फत नियुक्ती देणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Navneet Rana | फडणवीसांनी बॉम्ब फोडला तर संजय राऊतांना कुठं पळायचं आणि कुठं लपायचं सुचणार नाही; नवनीत राणांचे संजय राऊतांवर टीकास्त्र…

 

Related Posts