IMPIMP

MNS On Dhananjay Munde | राज ठाकरेंना ‘अर्धवटराव’ म्हणणार्‍या धनंजय मुंडेंना मनसेनं दिलं उत्तर, म्हणाले – ‘तुमच्या सारख्या तात्या विंचूचा…’

by nagesh
MNS On Dhananjay Munde | mns amey khopkar tweet after ncp dhananjay munde criticise raj thackeray in sangli

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS On Dhananjay Munde | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मनसे
अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यावर टीका करताना त्यांना अर्धवटराव असं म्हटलं होतं. धनंजय मुंडेंच्या टीकेला मनसेकडून
चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मनसे चित्रपटसेनेचे प्रमुख अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी याबाबत ट्विट केलं आहे. (MNS On Dhananjay Munde)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची ‘अर्धवटराव’ म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘तात्या विंचू’ चा ओम फट स्वाहा करणार आहेत, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार, Get Well Soon धनंजय मुंडे, असंही खोपकर म्हणाले आहेत.

 

 

धनंजय मुंडे काय म्हणाले होते ?
पूर्वी रामदास पाध्ये (Ramdas Padhye) यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या (BJP) बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरु आहे. अशाच प्रकारे रामदास पाध्येच्या तोंडून एक अर्धवटराव बोलत असल्याचं म्हणत धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंवर टीका केली होती. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

 

दरम्यान, राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यांवरून आधीच राजकारण तापलेलं असताना आता राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळत आहे.
राज ठाकरे यांची 1 मे ला औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा आहे त्या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Web Title :- MNS On Dhananjay Munde | mns amey khopkar tweet after ncp dhananjay munde criticise raj thackeray in sangli

 

हे देखील वाचा :

Menstrual Ayurvedic Treatment | मासिक पाळीच्या वेदनांमधून सुटका मिळवण्यासाठी जाणून घ्या आयुर्वेदिक उपाय

BJP MLA Ganesh Naik | भाजप आमदार गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक ? जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | बिबवेवाडीमधील ‘सराईत’ ओंकार उर्फ छोट्या लोखंडे व त्याच्या 5 साथीदारांवर ‘मोक्का’ ! पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 76 वी MCOCA कारवाई

 

Related Posts