IMPIMP

Modi Government | भारतीय नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो? मोदी सरकारने स्पष्टच सांगितले….

by nagesh
Modi Government | netaji subhash chandra boses photo to be printed on indian notes central governments reply in lok sabha

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय चलनातील (Indian Currency) नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा फोटो असतो. मोदी सरकारनं (Modi Government) त्यांच्या पहिल्या कारकिर्दीत जुन्या नोटा बदलल्या आणि नवीन नोटा बाजारात आणल्या. परंतु नोटा बदलल्या तरी मोदी सरकारने (Modi Government) नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवला. अनेकवेळा नोटांवर इतर महापुरुषांचे फोटो लावण्याबाबत चर्चा होते. आता यामध्ये आणखी एक चर्चा सुरु झाली असून यावर लोकसभेत (Lok Sabha) एका खासदाराने प्रश्न विचारला आहे. यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

खासदार महेंद्र सिंह सोलंकी (MP Mahendra Singh Solanki) यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात अर्थमंत्री निर्मला सितारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांना प्रश्न विचारला की, भारतीय नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांचा फोटो छापण्याचा सरकारचा इरादा आहे का? मोदी सरकार (Modi Government) नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो छापण्याचे नियोजन करत आहे का? जर असं असेल तर नेताजींचे फोटो असलेला नोटा कधी आणि केव्हा येणार? यावर केंद्र सरकारने स्पष्टच उत्तर दिले.

 

 

केंद्र सरकारकडून अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी (Pankaj Chaudhary) यांनी लोकसभेत या प्रश्नाला उत्तर देताना त्याचे खंडन केले आहे. याबाबत कुठलाही विचार अथवा प्रस्ताव नाही. त्यामुळे अन्य 2 प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाही. सरकारच्या या उत्तराने भारतीय नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो बदलून अन्य महापुरुषाचा फोटो लावण्याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

 

भारतीय नोटांवर महात्मा गांधींचा फोटो
आरबीआय (RBI) नुसार, महात्मा गांधी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त पहिल्यांदा महात्मा गांधी यांचा फोटो असलेल्या नोटांची छापाई केली गेली.
महात्मा गांधी यांचा फोटो 1, 2, 5, 10 आणि 100 रुपयांवर छापण्यात आले होते.
यामध्ये गांधीजी सेवाग्राम मध्ये (Sevagram) बसल्याचं दाखवण्यात आले होते.
तर 1 रुपयाच्या नोटेवर त्यांचा जवळचा फोटो आहे. 1987 मध्ये महात्मा गांधी यांचा फोटो असलेला 500 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती.
9 ऑक्टोबर 2000 रोजी 1 हजाराच्या नोटांवर महात्मा गांधी यांचा नोटा आरबीआयकडून छापण्यात आला होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Modi Government | netaji subhash chandra boses photo to be printed on indian notes central governments reply in lok sabha

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी विधानसभेत केली ‘ही’ मोठी घोषणा

Nitesh Rane | ‘महाविकास’वर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले – ‘त्यांच्या घरात कोण कुणासोबत…’

Nora Fatehi First Audition Video | नोरा फतेहीचा ऑडिशनचा 10 वर्षा आधीचा व्हिडिओ आला समोर; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का..

 

Related Posts