IMPIMP

Monsoon 2022 Forecast | खुशखबर ! मान्सून यंदा 99 टक्के बरसणार – हवामान विभाग (IMD)

by nagesh
Rain in Maharashtra | maharashtra rain update heavy rain in maharashtra mumbai pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Monsoon 2022 Forecast | राज्यात मागील काही दिवसापासून वाढत्या तापमानामुळे उन्हाचा कडाका लागला आहे. यामुळे माणसाच्या जीवाची काहिली होत आहे. यानंतर यंदाच्या हंगामात पाऊस (Monsoon 2022 Forecast) समाधानकारक बरसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. देशात सरासरीच्या साधारण 99 टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department (IMD) वर्तवला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा (Dr. Mrityunjaya Mohapatra) यांच्या माहितीनुसार, 2020 मधील पावसाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार सरासरीच्या 99 टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे. तो सामान्यत: 96 ते 104 टक्के राहील. 1971 – 2020 या कालावधीत संपूर्ण देशात मान्सून हंगामातील पावसाची दीर्घकालीन सरासरी 87 सेमी इतकी आहे. प्रशांत महासागराच्या विषवृत्तीय भागात ला निना परिस्थिती आहे. ला निनाची स्थिती पावसाळ्यात कायम राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. (Monsoon 2022 Forecast)

 

यंदा भारतीय समुद्री स्थिरांक (IOD) ची स्थिती सकारात्मक असून असल्याने देशात पाऊस चांगला होईल.
पण, ऑगस्ट नंतर ला नीना तटस्थ होणार आहे. त्या पुढची स्थिती आम्ही दर महिन्याला सांगणार आहोत.
अधिक तापमान किंवा कमी तापमानाचा मान्सूनची थेट संबंध नाही.
1971 ते 2020 इतक्या वर्षातील पावसाच्या आकडेवारीवर यंदाचा अंदाज आम्ही दिला असल्याचं महापात्रा यांनी सांगितलं.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, महाराष्ट्रातील (Maharashtra Monsoon 2022) सर्व भागात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडणार आहे.
मराठवाड्याच्या (Marathwada) दक्षिणेकडील भागात सरासरीच्या 110 टक्क्यांहून जादा पावसाची शक्यता व्यक्त केली गेलीय.
दरम्यान, त्याचवेळी नगर आणि परिसरात काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात जादा पावसाची शक्यता आहे.
त्याचबरोबर यंदा देशात सर्वदूर 99 टक्के पाऊस पडेल.
मात्र पूर्वोत्तर राज्यात तो सरासरीपेक्षा कमी पडेल तर राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यात तो सरासरीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :-  Monsoon 2022 Forecast | rainy season weather monsoon will rain 99 percent this year 2022 in india

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | मित्राच्या सर्व कुटुंबाला कोरोना झालाय, पैसे पाठव ! अमेरिकेतील भावाच्या फेसबुकवरील फोटो प्रोफाईलला लावून एकाचवेळी पुणे व दिल्लीत सायबर चोरट्यांनी घातला गंडा

Whatsapp New Group Voice Call Feature | व्हॉट्सअप ‘ग्रुप व्हॉईस कॉल’मध्ये 32 लोकांना सहभागी होण्याची देणार परवानगी, मोठ्या फाईल्स करता येतील शेअर

Pune Crime | शारीरीक संबंधाचे चित्रण करुन ते पहिल्या पतीला पाठवून केली बदनामी; वानवडी परिसरातील घटना

 

Related Posts