IMPIMP

Monsoon 2021 : 2 दिवसांत महाराष्ट्रात धडकणार ‘मान्सून’ !

by omkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – दोन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने (Monsoon) संपूर्ण केरळ व्यापला आहे. काल सकाळपासून केरळमध्ये (Kerala) जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर काही तासांतच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकच्या दिशेने आगेकूच केली आहे.
कर्नाटकच्या (Karnataka) किनारपट्टीचा बहुतांश भागात मान्सून दाखल झाला आहे. कारवारपर्यंत मान्सून पोहोचला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
येत्या 2 ते 3 दिवसांत मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Coronavirus : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून कसे रहायचे सुरक्षित? आतापासून सुरू करा ‘ही’ 8 कामे

दोन दिवस उशिराने मान्सून केरळमध्ये
आयएमडीने (IMD) केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्याचे गुरुवारी जाहीर केले. हवामान अनकूल असून पुढील दोन दिवसांत मान्सून कर्नाटकच्या काही भागांपर्यंत पोहचेल. अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे. मान्सून केरळमध्ये 3 जून रोजी दाखल होईल असा सुधारित अंदाज व्यक्त केला होता. या अंदाजानुसार मान्सून दोन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला.

IMD चा सुधारित अंदाज
सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि केरळमधील उर्वरित भागासह दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू हा भाग व्यापला आहे. बंगालच्या उपसागरातही मान्सून दाखल झाला आहे. दक्षिणेतील वाऱ्याच्या चक्रीय गतीमुळे मागील आठवड्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग श्रीलंकेच्या परिसरात मंदावला होता. त्यानंतर आता वेग घेतला आहे.

या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून अरबी समुद्रातील काही भाग व्यापेल.
तसेच गोवा आणि महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
याशिवाय पुढील 2 ते 3 दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
यामध्ये रायगड, ठाणे, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Also Read:- 

Devendra Fadnavis : ‘प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु, कालचा गोंधळ जरा जास्तच झाला’ (व्हिडीओ)

राजीव सातव यांच्या जागेवर आता कोण? ‘राहुल-प्रियांका’ यांच्यात नावावरून मतभेद

नारायण राणेंच्या टीकेनंतर खा. संभाजीराजेंचं सूचक ट्वीट, म्हणाले…

Devendra Fadnavis : ‘राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 5 सुपर मुख्यमंत्री’ (व्हिडीओ)

2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये आता घरमालकाचा समावेश

Internet Media : ‘ईस्ट इंडिया कंपनी’प्रमाणे वागू शकत नाही इंटरनेट मीडिया : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल सतत होतंय महाग, मोडले सर्व रेकॉर्ड

 

Related Posts