IMPIMP

MP Amol Kolhe | “कर्नाटक सरकारकडून अडेलटट्टूपणाचे धोरण…” गृहमंत्री अमित शहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

by nagesh
MP Amol Kolhe | amol kolhe talk after amit shah meet mahavikad aghadi mps over maharashtra karnatak dispute

दिल्ली : वृत्तसंस्था – गेले अनेक दिवस चाललेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रकरणी राष्ट्रवादीचे लोकसभा खासदार अमोल कोल्हे यांनी इतर महाविकास आघाडीच्या खासदारांसह गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांची बाजू संवेदनशीलपणे ऐकल्यानंतर परस्पर समन्वयाने तोडगा काढू, असे आश्वासन अमित शहांनी दिले असल्याची माहिती अमोल कोल्हेंनी (NCP MP Amol Kolhe) दिली.

 

कर्नाटक सरकारवर टीका करत अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) म्हणाले, “अडेलटट्टू आणि हडेलहट्टीपणाचे धोरण कर्नाटक सरकारकडून राबवलं जात आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने विधानं केली जात आहेत. महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ले होत असून, महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात येण्यापासून रोखलं जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं आहे. त्यामुळे देशात मुक्त संचारची मुभा आहे. यालाच कुठेतरी आडकाठी करण्याचं काम केलं जात आहे,”

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अमित शहांशी झालेल्या भेटीची माहिती अमोल कोल्हेंनी दिली,
“गृहमंत्री १४ डिसेंबरला मुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी चर्चा करणार असल्याचं कळलं.
त्यातून समन्वयामुळे मार्ग निघेल. बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी येथील मराठी भाषिकांवर सारखे अत्याचार होत आहे.
त्यांच्यावर कानडी वरवंटा फिरवला जातोय, यावर कुठेतरी चाप बसून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे,” असेही अमोल कोल्हे म्हणाले.

 

Web Title :- MP Amol Kolhe | amol kolhe talk after amit shah meet mahavikad aghadi mps over maharashtra karnatak dispute

 

हे देखील वाचा :

Vasant More | वसंत मोरेंची नाराजी दूर करायला अमित ठाकरेंची मध्यस्थी; नाराजी दूर होणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष

NCP Chief Sharad Pawar | पवारांच्या इशाऱ्याला ४८ तास उलटल्यानंतर युतीच्या दोन नेत्यांकडून शरद पवारांवर निशाणा

Pune Police Inspector Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयातील 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

CitiusTech Expands Footprint | सिटीअसटेकने पुण्यात नवीन सुविधांद्वारे केला फूटप्रिंटचा विस्तार

 

Related Posts