IMPIMP

MP Sanjay Raut | भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे, संजय राऊतांचे चित्रा वाघ यांच्या टीकेला प्रत्युत्तर

by nagesh
Chitra Wagh On Sanjay Raut | BJP leader chitra wagh replied to sanjay raut criticism on narendra modi and amit shaha karnatak election 2023

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) मुंबईत महामोर्चा काढला जाणार आहे असून मुंबईतील राजकीय
वातावरण चांगलेच तापले आहे. यातच भाजप महिला आघाडीच्या (BJP Mahila Aghadi) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे गटाचे (Thackeray
Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यात कलगीतुरा रंगताना पहायला मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna
Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्म कुठे झाला? याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर चित्रा वाघ (MP Sanjay Raut) यांनी टीका
केली. चित्रा वाघ यांच्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलेल्या विधानावर चित्रा वाघ यांनी शुक्रवारी ट्विट करुन टीका केली होती. रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचं दर्शन आज महाराष्ट्राला झालं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) महू येथे झाला आहे. इतकं सामान्य ज्ञान असू नये? आमचे आदर्श असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवता आहात? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. अशा पद्धतीने राष्ट्रपुरुषांचा अपमान तुम्ही करायचा आणि मोर्चेपण तुम्हीच काढायचे, मूर्ख समजू नका महाराष्ट्राला तुम्हाला पुरता ओळखून आहे, तुमचा जाहीर निषेध असं ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे.

 

 

काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे

चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. भाजपच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे मेंदू आहेत असं मला दुर्दैवाने म्हणावं लागत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का? त्या नात्याने आम्ही म्हटलं की ते आमचे आहेत. त्यांचा जन्म भारतात 1891 साली आत्ताच्या मध्य प्रदेशात झाला. तेव्हा मध्य प्रदेश नव्हतं. फक्त एकच मुंबई प्रांत होता. भाषिक राज्य कधी निर्माण झाली, याचा अभ्यास करावा. त्यांना कळतं? अभ्यास त्यांनी करायचाय, असे राऊत म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाजपमध्ये काय लायकीचे आणि…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, तेव्हा देशात कोणतंही राज्य नव्हतं.
आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत हे जर त्यांना माहीत नसेल,
कळत नसेल तर अजूनही त्यांच्या आंबेडकरांविषयी काय भावना आहेत, हे स्पष्ट होतंय.
भाजपमध्ये काय लायकीचे आणि बुद्धीचे लोक बाहेरुन घेतलेत ते कळतंय.
त्यांच्या जिभेवर काय, डोक्यात काय, पोटात काय? वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर,
फुलेंचा अपमान करतायत आणि आम्हाला शिकवतायत, अशी टीका संजय राऊत यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली.

 

Web Title :- MP Sanjay Raut | shivsena sanjay raut slams chitra wagh bjp on babasaheb ambedkar comment

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे पोलिसांकडून मुलुंडमधील बनावट कॉल सेंटर उध्वस्त ! लोनच्या नावाने कोटयावधीची फसवणूक, 40 मोबाईल जप्त

Samruddhi Highway | समृद्धी महामार्गावर कारला भीषण आग, कार जळून खाक; पुण्यातील कुटुंब थोडक्यात बचावलं

Thackeray Group | नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; ‘राऊतांची पाठ फिरली अन् नगरसेवक देखील फिरले…’

 

Related Posts