IMPIMP

Thackeray Group | नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; ‘राऊतांची पाठ फिरली अन् नगरसेवक देखील फिरले…’

by nagesh
CM Eknath Shinde | shivsena saamana editorial chhatrapati sambhaji maharaj statement abou ajit pawar

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत गुरुवारी नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी यावेळी
स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केले. त्यांनी नाशिक सोडले आणि दुसरीकडे ठाकरे गटाच्या (Thackeray Group) अकरा
माजी नगरसेवकांनी देखील शिवसेना सोडली. नाशिकच्या 11 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला.
सर्व माजी नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यात महानगरपालिकेचे माजी
विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि माजी स्थायी समिती सदस्य रमेश धोंगडे यांचा समावेश आहे. (Thackeray Group)

 

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या दौऱ्यात झालेल्या बैठकीत काही माजी नगरसेवकांनी गैरहजेरी लावली. राऊतांची पाठ फिरली आणि नगरसेवक देखील फिरले आणि शिंदे गटात सामील झाले. संजय राऊत शिवसेनेच्या नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र भागाचे संपर्कप्रमुख आहेत. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर ठाकरे गटाचा (Thackeray Group) नाशिक जिल्हा मजबूत होता. परंतु आता शिंदेनी हा अभेद्य गड फोडत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिकात 32 नगरसेवक आहेत. त्यापैकी अकरा माजी नगरसेवकांनी रात्री उशिरा शिंदे गटात प्रवेश केला. यात माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, सुदाम डेमसे, पूनम मोगरे, प्रताप महरोलिया, ज्योती खोले, जयश्री खर्जुल, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले, राजूअण्णा लवटे यांचा समावेश आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाशिक दौऱ्यात संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या आगामी 17 डिसेंबरच्या महामोर्चावर भाष्य केले होते.
राज्य शासनाने अद्याप या मोर्चाला परवानगी दिली नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.
राऊत म्हणाले, आम्ही मोर्चा काढणारच, आम्हाला कोणी रोखू शकत नाही.
आम्ही मोर्चा काढू नये असे जर सरकारला वाटत असेल, तर त्यांनी राज्यपालांची पदावरून हाकलपट्टी करावी.
भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवदी यांच्यावर कारवाई करावी. आम्ही त्यांच्या विरोधात मोर्चा काढत आहोत.
आमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे.

 

 

Web Title :- Thackeray Group | big set back to uddhav thackerays shivsena in nashik 11 former corporators join chief minister eknath shinde party

 

हे देखील वाचा :

Pune Police | बदनामीच्या हेतूने IPS अधिकार्‍यावर आरोप करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या नावाने लिहिली पत्रे, गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यात विविध कारवायांमध्ये साडे नऊ लाखांचे अमली पदार्थ जप्त

Pune Crime | पुण्यात गस्तीवरील वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर गुंडाच्या टोळक्याची दगडफेक

Rajabhau More Passes Away | मराठी मनोरंजन सृष्टीतून वाईट बातमी; ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे निधन

 

Related Posts