IMPIMP

Mula-Mutha River Rejuvenation Project | मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत बंडगार्डन ते मुंढवा दरम्यानच्या कामाची 650 कोटी रुपयांची निविदा मागविली

by nagesh
Mula-Mutha River Rejuvenation Project | Tender of Rs. 650 crore for work between Bundgarden and Mundhwa under Mula-Mutha River Rejuvenation Project

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Mula-Mutha River Rejuvenation Project | नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा अंतर्गत महापालिकेने (Pune Corporation) बंडगार्डन पूल ते मुंढवा (स्ट्रेच 10 व 11) या दोन्ही काठाचा क्रेडिट नोटच्या बदल्यात PPP तत्वावर विकास करण्यासाठी निविदा काढली आहे. पालिकेने यापूर्वी संगमवाडी ते बंडगार्डन पुलापर्यंतच्या (Sangamwadi to Bundgarden Bridge) दोन्ही काठांचा विकास करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. (Mula-Mutha River Rejuvenation Project)

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा अंतर्गत महापालिका पुणे शहराच्या मध्यातून जाणाऱ्या मुळा – मुठा नदीच्या दोन्ही काठांचा विकास (Mula-Mutha River Rejuvenation Project) करणार आहे. सुमारे 44 कि.मि. नदी काठावर पिचिंग करून नदीचे खोलीकरण करण्यात येणार आहे. तसेच नदी काठावर ठिकठिकाणी उद्याने, छोटी मैदाने, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, विरंगुळा केंद्र करण्यात येणार असून मोठया प्रमाणावर वृक्षा रोपण ही करण्यात येणार आहे.

 

काही ठिकाणी नदीतील गाळ काढून नदी प्रवाही करण्यात येईल. तसेच संगम पूल ते बंडगार्डन पुला दरम्यान बोटिंगची सुविधाही करण्यात येणार आहे.  ही कामे करत असताना पूर रेषा, आणि पर्यावरणाचे कुठेही उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेऊन तसेच NGT सह संबंधित सर्वच विभागाच्या परवानग्या घेऊनच हा प्रकल्प केला जाणार आहे.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

GST सह सुमारे 4700 कोटी रुपयांचा हा प्रकल्प  आहे. बंडगार्डन ते मुंढवा (Bundgarden to Mundhwa) या टप्प्यासाठी सुमारे 650 कोटी रुपये खर्च येणार आहे. या कामची निविदा आज काढण्यात आली आहे.  १ जानेवारीला प्रिबीड मिटिंग होणार असून 7 फेब्रुवारीला निविदा उघडण्यात येणार आहे, असे प्रकल्प अधीक्षक अभियंता युवराज देशमुख (Superintendent Engineer Yuvraj Deshmukh) यांनी नमूद केले आहे.

 

Web Title :- Mula-Mutha River Rejuvenation Project | Tender of Rs. 650 crore for work between Bundgarden and Mundhwa under Mula-Mutha River Rejuvenation Project

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | खुशखबर! आज चांदीच्या किमतीत मोठी घसरण, सोने सुद्धा झाले स्वस्त; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

Pune Corporation | पुणे महापालिकेची मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना ! शास्तीच्या रकमेत मिळणार 75 % सवलत पण…

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरने सोनोरी ड्रेसमध्ये दाखवली कातिलाना फिगर, फोटोंनी लावली आग

 

Related Posts