IMPIMP

Multibagger Penny Stock | रू. 19 चा स्टॉक वाढून रू. 494 चा झाला, 6 महिन्यात गुंतवणुकदार झाले मालामाल; तुमच्याकडे आहे का

by nagesh
Multibagger IT Stock | tata elxsi share delivered more than 67000 percent return

नवी दिल्लीवृत्तसंस्था-Multibagger Penny Stock | बाजारात अनेक प्रकारचे स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना काही काळातच मालामाल बनवले आहे. जर तुम्हाला शेयर बाजारात (Stock Market) गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पेनी स्टॉकमध्ये (Penny stock) गुंतवणूक करू शकता. सध्या अनेक मल्टीबॅगर पेनी स्टॉकने (Multibagger Penny Stock) गुंतवणुकदारांना शानदार रिटर्न (investment return) दिला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पेनी स्टॉक असे स्टॉक असतात जे (What is penny stock) खुप स्वस्त असतात आणि त्यांचे बाजार मूल्य कमी असते. रघुवीर सिंथेटिक (Raghuvir Synthetics) सुद्धा एक असाच स्टॉक आहे.

 

रू. 19 चा स्टॉक वाढून 494 चा झाला

रघुवीर सिंथेटिक्स (Raghuvir Synthetics) च्या स्टॉकने मागील सहा महिन्यात आपल्या शेयर धारकांना 2,455% रिटर्न दिला आहे. हा पेनी स्टॉक यावर्षी 4 जून, 2021 ला 19.33 रुपयांवर होता जो सोमवारी बीएसईवर 52 आठवड्याचा उच्च स्तर 494.05 रुपयांवर पोहचला.

 

6 महिन्यात 1 लाख झाले 25 लाखापेक्षा जास्त

सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये गुंतवलेले 1 लाख रुपये आज 25.55 लाख रुपये झाले आहेत. मागील 21 सत्रात या स्मॉल कॅप स्टॉकमध्ये 177.79% ची तेजी आली आहे. शेयर 4.99% च्या वाढीसह 494.05 रुपयांवर खुला झाला. (Multibagger Penny Stock)

 

फर्मचे मार्केट कॅप 1,914 कोटी रुपये

रघुवीर सिंथेटिक्सचा स्टॉक 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस,
100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अ‍ॅव्हरेजच्या वर आहे.
फर्मचे मार्केट कॅप वाढून 1,914 कोटी रुपये झाले.
फर्मच्या एकूण 5,824 शेयरने सोमवारी बीएसईवर 28.77 लाख रुपयांचा व्यवहार केला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

जाणून घ्या कंपनीबाबत

सप्टेंबर 2021 ला समाप्त तिमाहीसाठी, चार प्रमोटरकडे 74.91% भागीदारी किंवा 29.02 लाख शेयर आणि
3,831 सार्वजनिक शेयरधारकांकडे कंपनीची 25.09% भागीदारी किंवा 9.72 लाख शेयर होते.
मार्च 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी,
फर्मने शुद्ध लाभात 137.50% च्या वाढीसह 5.89 कोटी रुपयांची वाढ नोंदवली,
जी मार्च 2020 च्या आर्थिक वर्षात 2.48 कोटी रुपये होती.

 

ही आहेत कंपनी उत्पादने

रघुवीर सिंथेटिक्सच्या शेयरने मागील महिन्यादरम्यान बाजार प्रतिफळाच्या
बाबतीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
रघुवीर सिंथेटिक सर्वात मोठी टेक्सटाइल प्रोसेसिंग कंपन्यांपैकी एक आहे.
कंपनीच्या उत्पादनात बेड लिनन/बिछाना, पडदे, टॉवेल, स्वयंपाक घरातील उत्पादने,
अपहोल्स्ट्री रंग आणि 100% कापूस पॅचवर्क आणि रजई यांचा समावेश आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger stock rs 19 to rs 494 this penny stock rises in just six months

 

हे देखील वाचा :

Covid Jab | बिहारमध्ये PM मोदी-सोनिया-प्रियंकाने घेतला कोरोनाचा डोस! आरोग्य विभागाचा अजब खेळ

Pune Crime | पुण्यात किरकोळ वादातून संतापलेल्या पतीने पत्नीला दिला भयंकर मृत्यू

Pune Crime | 27 वर्षीय IT इंजिनिअर प्रियकरानं 29 वर्षीय संगणक अभियंता प्रेयसीला घातली ‘गळ’, म्हणाला – ‘आपण लग्न करणार आहोत, तू तुझा न्युड व्हिडीओ पाठवं’, Video सेंड केल्यानंतर घडलं भलतच ‘कांड’

 

Related Posts