IMPIMP

Multibagger Penny Stocks | जलद रिटर्न ! 36 पैशांचा शेअर झाला 2380 रुपयांचा, 1 लाख लावले असते तर 65 कोटी मिळाले असते!

by nagesh
Multibagger Stock | multibagger stock turns rs 1 lakh to rs 50 crore by  giving only 1 bonus issue

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMultibagger Penny Stocks | शेअर बाजार (Stock Market) हे अतिशय अस्थिर क्षेत्र आहे. येथे, शेअर खरेदी-विक्रीच्या दरम्यान एखादा शेअर केव्हा गुंतवणूकदारांना (Investors) कंगाल बनवू शकतो आणि कधी श्रीमंत बनवू शकतो हे सांगता येत नाही. (Multibagger Penny Stocks)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याचे ताजे उदाहरण म्हणजे ज्योती रेजिन्स अँड अ‍ॅडेसिव्ह लिमिटेड Jyoti Resins And Adhesive Ltd चा शेअर. या 36 पैशांच्या शेअरने आज आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.

 

एक लाख रुपये झाले 65 कोटी
या कंपनीच्या शेअरची किंमत 2004 मध्ये केवळ 36 पैसे होती. पण 19 जुलै 2022 रोजी तो 2380 रुपयांवर व्यवहार करत आहे. (Multibagger Penny Stocks)

 

या किरकोळ किमतीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना (Investors) सुमारे 6,64,898 टक्के रिटर्न (Return) दिला आहे.

 

दुसर्‍या शब्दांत, जर एखाद्या गुंतवणूकदाराने कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आता ही रक्कम सुमारे 65 कोटी रुपये झाली असती.

 

2004 मध्ये 1 रुपयापेक्षा कमी किंमत
BSE मधील Jyoti Resins And Adhesive Ltd च्या शेअरच्या किमतीचा ऐतिहासिक डेटा (Historical Data) पाहिल्यास, एप्रिल 2004 मध्ये या शेअरची किंमत 36 पैसे होती.

 

10 वर्षांनंतरही या शेअरची किंमत फारशी वाढली नाही आणि एप्रिल 2014 मध्ये त्याची किंमत 7.83 रुपयांवर पोहोचली होती.

 

मात्र, याच्या पुढील वर्षापासून या स्टॉकमध्ये सुरू झालेला ट्रेंड अजूनपर्यंत सुरू आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

2016 नंतर घेतला जोरदार वेग
एप्रिल 2015 मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 10 रुपयांच्या पुढे गेली आणि एका शेअरची किंमत 13.40 रुपये झाली.

 

वर्षभरातच 100 टक्क्यांनी उसळी घेतली आणि तो 103 रुपयांवर पोहोचला. यानंतर अनेकवेळा तेजीला ब्रेक लागला, पण हा स्टॉक सावरला सुद्धा.

 

जुलै 2022 पर्यंत त्याची किंमत 2401 रुपयांच्या पुढे गेली होती.
नुकसातच Jyoti Resins चा हा शेअर थोड्या घसरणीसह 2380 रुपयांवर व्यवहार करत होता.

 

कोरोना काळात गुंतवणूकदार मालामाल
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोना (Corona) च्या संकटाच्या काळात या स्टॉकने आपल्या अनेक गुंतवणूकदारांची झोडी भरली.

 

मे 2020 मध्ये शेअरची किंमत (Share Price) 111.80 रुपये होती, जी एका वर्षानंतर मे 2021 मध्ये 697.25 रुपये झाली.

 

त्याच वेळी, मे 2022 मध्ये, या शेअरची किंमत प्रचंड वाढीसह 2313.70 रुपयांवर पोहोचली.
गेल्या एका वर्षातच या शेअरने गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Multibagger Penny Stocks | jyoti resins and adhesive stock give big return to investors 1 lakh turn 65 crore

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | “D-Mart’चा लाखो रुपयांचा माल टेम्पोमधून चोरीला

OBC Political Reservation Maharashtra | ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा, बांठिया अहवालानुसार निवडणुका घ्याव्यात, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

PM Kisan Samman Nidhi Yojana | जाणून घ्या केव्हा जमा होईल किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता, असे अपडेट करा KYC

 

Related Posts