IMPIMP

PM Kisan Samman Nidhi Yojana | जाणून घ्या केव्हा जमा होईल किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता, असे अपडेट करा KYC

by nagesh
PM Kisan | pm kisan narendra singh tomar says 8 42 cr farmers paid pm kisan instalment in aug nov

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan Samman Nidhi Yojana | देशभरातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळणार्‍या रकमेची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु शेतकरी बांधवांनी हे लक्षात ठेवावे की या योजनेच्या 12 व्या हप्त्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात तेव्हाच जमा होईल जेव्हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटला भेट देऊन केवायसी पूर्ण केलेले असेल. (PM Kisan Samman Nidhi Yojana)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता ऑगस्ट-नोव्हेंबर दरम्यान नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित आहे. कोट्यवधी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा 12वा हप्ता PM नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जारी करणार आहेत. यापूर्वी पीएम-किसान योजनेचा हप्ता 31 मे रोजी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. (PM Kisan Samman Nidhi Yojana)

 

शेतकर्‍यांनी लवकर पूर्ण करावे KYC
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत रक्कम मिळविण्यासाठी शेतकर्‍यांना पीएम किसान ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. खाली eKYC पूर्ण करण्याच्या प्रत्येक टप्प्याबद्दल माहिती दिली आहे, त्यानुसार तुम्ही घरी बसून eKYC करू शकता –

 

अशी पूर्ण करा पीएम किसान eKYC प्रक्रिया

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/NewHome3.aspx ला भेट द्या

ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा

तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाका आणि ’सर्च’ वर क्लिक करा.

आधार कार्डशी लिंक केलेला अधिकृत मोबाइल क्रमांक टाकणे आवश्यक आहे

गेट OTP वर क्लिक करा. यानंतर मोबाईल नंबरवर ओटीपी मिळेल.

त्यानंतर ओटीपी टाकून एंटर दाबा.

जवळच्या पीएम किसान CSC केंद्राला भेट द्या.

पीएम किसान खात्यात तुमचे आधार अपडेट करा

पीएम किसान खात्यात लॉग इन करण्यासाठी तुमचे बायोमेट्रिक्स प्रविष्ट करा

आधार कार्ड क्रमांक अपडेट करा

केंद्रावर फॉर्म सबमिट करा.

तुम्हाला तुमच्या फोनवर एक पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

असा तपासा PM किसान निधीचा हप्ता
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट – https://pmkisan.gov.in/ वर जा. होमपेजवर ’फार्मर्स कॉर्नर सेक्शन’ शोधा. येथे ’लाभार्थी स्थिती’ पर्याय निवडा. यामध्ये लाभार्थी त्याच्या अर्जाची स्थिती तपासू शकतो. यादीत शेतकर्‍याचे नाव आणि त्याच्या बँक खात्यावर पाठवलेली रक्कम असेल. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना 3 समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. 2 हेक्टरपर्यंतची संयुक्त जमीन/मालकी असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना मदत दिली जात आहे.

 

राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मदतीसाठी पात्र असलेल्या शेतकरी कुटुंबांची निवड करते आणि थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित केले जातात.

 

Web Title :- PM Kisan Samman Nidhi Yojana | pm kisan samman nidhi yojana know when the 12th installment of kisan samman nidhi yojana will be deposited update kyc like this

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Pune Metro | पुणेकारांसाठी महत्वाची बातमी ! वनाझ ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 1 ऑगस्ट रोजी सुनावणी, 29 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात झालेला युक्तिवाद

 

Related Posts