IMPIMP

Multibagger stock | एकेकाळी 2 रुपयात विकला जाणारा शेअर आज 2,000 च्या जवळ पोहचला, केवळ 5 वर्षात दिला 1000% रिटर्न

by nagesh
Torrent Pharmaceuticals Ltd | torrent pharmaceuticals ltd 1 lakh skyrocketed 1000 times to 17 crore after bonus share

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMultibagger stock | शेअर बाजारातील प्रत्येक गुंतवणूकदाराला वाटते की, आपल्याकडे कमी पैशात मोठा रिटर्न देणारा शेअर असावा. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांची एक नजर चांगली क्षमता असलेल्या पेनी स्टॉकवर असते. त्यांची किंमत 10 रुपयांच्या खाली असते आणि तुम्ही थोड्या पैशातही चांगला व्हॅल्यूम खरेदी करू शकता. मात्र, कधी आणि कोणता स्टॉक रॉकेट बनेल हे सांगता येत नाही. (Multibagger stock)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत जो एकेकाळी पेनी स्टॉक होता पण आज तो 2,000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. तेव्हापासून या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 95000 टक्के रिटर्न दिला आहे. हा दीपक नायट्रेटचा शेअर आहे. हा स्टॉक 1995 मध्ये बीएसईवर लिस्ट झाला होता. या शेअरकडून अजूनही चांगल्या रिटर्नची तज्ज्ञांना अपेक्षा आहे. (Multibagger stock)

 

1 लाख रुपयांतून कमावले 9 कोटी

10 ऑगस्ट 2001 रोजी दीपक नायट्रेटचा शेअर बीएसईवर 1.96 रुपये होता.
स्टॉक 29 जुलै 2022 रोजी 1915 रुपयांवर बंद झाला.
जर कोणी 10 ऑगस्ट 2001 रोजी दीपक नायट्रेटच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ते कायम ठेवले असते तर ती रक्कम 9.75 कोटी रुपये झाली असती.

या शेअरने गेल्या 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे.
या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3,020 रुपये आहे. याक्षणी ते 1681 च्या 52 आठवड्यांच्या नीचांका जवळ आहे.
त्यामुळे त्याच्यात आता तेजी येईल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. शुक्रवारी हा शेअर सुमारे 12 रुपयांच्या वाढीसह बंद झाला.

 

परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा स्टॉक

परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेत असताना दीपक नायट्रेटने त्यांना आपल्याकडे वळवले.
31 मार्चपर्यंत यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा 8.76 टक्के होता, जो 11 जुलैपर्यंत वाढून 9.07 टक्के झाला आहे.
याशिवाय एलआयसीने दीपक नायट्रेटमधील आपला हिस्सा 4.6 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

 

10 वर्षात 1 लाखाचे झाले 1 कोटी रुपये

14 सप्टेंबर 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये दीपक नायट्रेटचा शेअर 17.19 रुपयांच्या पातळीवर होता.
कंपनीच्या शेअरने 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना 10,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे.
जर एखाद्या व्यक्तीने त्यावेळेस दीपक नायट्रेटच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याची गुंतवणूक 1 कोटींहून जास्त झाली असती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www. sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : – Multibagger stock | multibagger stock shares once sold for rs 2 today reached close to 2000 gave a return of 1000 percent in just 5 years

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | कामावर घेण्यास नकार दिल्याने गैरवर्तन करुन महिलेचा विनयभंग, आरोपी गजाआड

मेटा WhatsApp मध्ये लवकरच करणार मोठा बदल, ग्रुप अ‍ॅडमिनला मिळेल ही Power

Aadhaar Voter ID Link | आधारसोबत मतदारांचे नाव जोडले जाण्याच्या कामाचा शुभारंभ आजपासून, जाणून घ्या – कशी आहे पूर्ण प्रक्रिया

Related Posts