IMPIMP

Mumbai Pune Expressway Accident News | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात ट्रकचा टायर फुटल्याने भीषण अपघात; सोलापूरचे 4 जण जागीच ठार

by nagesh
 Amrawati Crime News | a 20 year old boy died in front of his father in a bike accident on chandurbazar shirala road

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway Accident News) बोरघाटात (Borghat) मंगळवारी सकाळी ट्रकचा टायर फुटल्याने भीषण अपघात होऊन सोलापूरच्या चौघांचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात बोरघाटातील खोपोली (Khopoli) बाजूला आज सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी घडला. सहा वाहने एकामेकाना धडकल्याने हा अपघात झाला. (Mumbai Pune Expressway Accident News)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत महामार्ग पोलिसांनी (Highway Police) दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या महामार्गावर (Mumbai Pune Expressway Accident News) अपघात झाला आहे. अपघातात चौघांचा जागीच मृत्यु झाला. किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये (MGM Hospital Panvel) दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा दल, देवदूत रेस्क्यु टीम आणि खोपोली, खंडाळा महामार्ग पोलीस (Khandala Highway Police) दाखल झाले. या अपघाताने मुंबईकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक ठप्प (Traffic Jam) झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ही वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली आहे.

 

अपघात ठिकाण व वेळ –

मंगळवार (आज) रोजी 06.40 वा. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुणे मुंबई लेनवर किमी 40.100 येथे झाला आहे.

सदर अपघातात बाबत ठाणे कंट्रोल व मुंबई कंट्रोल यांना कळविणेत आलेले आहे.

 

अपघातातील वाहने –

1) कंटेनर नं MH 46 BM 5259

2) कार नं MH 21 BQ 5281

3) ट्रक नं MH12 SX 2127

4) टेम्पो नं MH 10 AW 7611

5) स्विफ्ट कार MH 13 BN 7122

6) ट्रक MH 46 AR 3877

 

मयतांची नावे –

1) गौरव खरात वय-36

2) सौरभ तुळसे वय-32

3) सिद्धार्थ राजगुरू वय-31

4) नाव समजून येत नाही
(सर्व रा.सोलापूर)

 

अपघातचे कारण –

किमी 39.000 येथे ट्रक चा टायर फुटल्याने सदर ट्रक मुंबई लेनवरील पहिल्या लेनवर बंद पडल्याने किमी 40.000 पर्यंत वाहतूक कोंडी होऊन वाहतूक संथ गतीने चालू होती. वरील ठिकाणी यातील ट्रक नं MH 46 AR 3877 वरील चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून त्याने समोरील 1) स्विफ्ट कार MH 13 BN 7122 व 2) टेम्पो नं MH 10 AW 7611 ला पाठीमागून जोरदार धडक मारल्याने सदर वाहने त्यापुढील कार नं MH 21 BQ 5281 व कंटेनर नं MH 46 BM 5259 वर आदळून अपघात झाला आहे. अपघातामध्ये स्विफ्ट कार MH 13 BN 7122 मधील वरील 4 इसम जागीच मयत झाले आहेत.

 

तसेच कार नं MH 21 BQ 5281मधील 3 प्रवासी याना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर अंबुलन्स मध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. तसेच टेम्पो नं MH 10 AW 7611 मधील 4 प्रवासी याना मुका मार लागल्याने पाठवण्यात आले आहे. अपघात ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशन कडील स्टाफ हजर असून मयत याना पुढील कार्यवाही करिता खोपोली नगरपालिका हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे. अपघाती सर्व वाहने रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघात ठिकाणी देवदूत टीम, IRB कडील यंत्रणा यांनी मदत केली आहे.

 

#Accident #Maharashtra #Borghat # Khopoli # Pune #Mumbai

 

Web Title :- Mumbai Pune Expressway Accident News | mumbai pune expressway accident news 6 vehicles collided with each other four dead form solapur borghat khopoli highway police

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी आवश्यक बातमी, पेन्शनच्या नियमात मोठा बदल; ग्रॅच्युटीवर सुद्धा निर्णय

7th Pay Commission | मोदी सरकार ‘या’ दिवशी देईल फिटमेंट फॅक्टरला मंजूरी ! बेसिक वेतनात होईल 96000 रुपयांची वाढ

Pune Crime | PMPML बसमध्ये चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड; सहकारनगर पोलिसांकडून मुद्देमाल जप्त

 

Related Posts