IMPIMP

Munna Yadav | मुन्ना यादवने ‘ते’ आरोप फेटाळले; म्हणाले – ‘नवाब मलिकांची औकात फक्त 1 रुपयाची म्हणून…’

by nagesh
Munna Yadav | nagpur bjp leader muuna yadav replay ncp minister nawab malik allegations over connection underworld

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Munna Yadav | राष्ट्रवादी काॅग्रेसचे (NCP) प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिकांच्या (Nawab Malik) आरोपामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मलिकांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केला. तसेच समीर वानखेडे, मुन्ना यादव, हैदर आझम आणि बनावट नोटा प्रकरणावरुन मलिकांनी फडणवीसांवर आरोप केला. फडणवीसांच्या संरक्षणात बनावट नोटांचा खेळ सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर, मुन्ना यादव (Munna Yadav) यांच्यावर मलिकांनी केलेल्या आरोपानंतर आता यादवने प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

नवाब मलिकांनी (Nawab Malik) आज पत्रकार परिषदेत मुन्ना यादव (Munna Yadav) यांचं नाव घेत एका गुंडाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंडळाचा अध्यक्ष केल्याचा आरोप केला होता. मुन्ना यादव हे कुख्यात गुंड असून त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे आहेत असा दावा देखील मलिकांनी केला. पंरतु, मलिकांचे सर्व आरोप भाजप (BJP) नेते मुन्ना यादवने फेटाळून लावत प्रत्युत्तर दिलं. ‘देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी मलिक यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत. म्हणून ते माझ्या माध्यमातून फडणवीसांना टार्गेट करत आहेत. माझ्या विरोधात असलेल्या राजकीय गुन्ह्यांना मलिक गुन्हेगारी जगताशी जोडून मला गुंड म्हणत आहेत. असं ते म्हणाले.

 

पुढे मुन्ना यादव (Munna Yadav) म्हणाले, नवाब मलिक यांची औकात 1 रुपयाची आहे. म्हणूनच त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा देखील 1 रुपयाचाच ठोकणार. त्यांनाही माझं आवाहन आहे की माझी चौकशी करावी. माझ्यावरील आरोप जर सिद्ध झाले तर राजकारणातून सन्यास घेईन. पण मी न्यायालयात जाणार आणि तिथं नवाब मलिकांवरील आरोप सिद्ध करणार, असं मुन्ना यादव यांनी सांगितलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

कोण आहेत मुन्ना यादव?

ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव (Munna Yadav) हे सुरुवातीला स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर
या विधानसभा मतदार संघातील चुनाभट्टी परिसरातून नगरसेवक होते.
यादव हे नागपुरात फडणवीस यांचे खंदे समर्थक आणि उजवा हात म्हणून ओळखले जातात.
मुन्ना यादवच्या समर्थनास आणि नवाब मलिकांच्या विरोधात आज नागपुरात भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले.
तर नवाब मलिक यांचा पुतळा जाळून कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

 

Web Title :- Munna Yadav | nagpur bjp leader muuna yadav replay ncp minister nawab malik allegations over connection underworld

 

हे देखील वाचा :

Nana Patole | मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांची चौकशी करावी – काँग्रेस

Pune Traffic | पुण्यातील कामगार पुतळा, राजीव गांधी वसाहत पुनर्वसन कारवाई गुरूवारी; शिवाजीनगर कोर्टाजवळील परिसरातील वाहतूक मार्गात बदल

Mayor Muralidhar Mohol | महापौरांचा रक्तदानाचा संकल्प पुणेकरांकडून सिद्धीस ! मुरलीधर मोहोळांवर रक्तदानरुपी शुभेच्छांचा वर्षाव, 3860 जणांकडून रक्तदान; लेकीसह महापौरांकडून ‘महादान’ !

 

Related Posts