IMPIMP

Pune Traffic | पुण्यातील कामगार पुतळा, राजीव गांधी वसाहत पुनर्वसन कारवाई गुरूवारी; शिवाजीनगर कोर्टाजवळील परिसरातील वाहतूक मार्गात बदल

by nagesh
Pimpri Traffic News | traffic changes on the occasion of kartiki yatra motorists please use an alternate route

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Traffic | महामेट्रोच्या (Maha Metro) कामासाठी शिवाजीनगर (Shivajinagar) येथील राजीव गांधीनगर आणि कामगार पुतळा येथील झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाची कारवाई करण्यासाठी गुरूवारी (दि. ११) या परिसरातील वाहतुकीमध्ये बदल (Pune Traffic) करण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुनर्वसनाच्या कारवाईसाठी संचेती हॉस्पीटल समोरील अंडरपास येथून शिवाजीनगर न्यायालयाकडे जाणारी वाहतूक बंद (Pune Traffic) करण्यात येणार आहे. या मार्गावरून जावू इच्छिणार्‍या वाहनांनी इंजिनिअरींग कॉलेज चौक, आर.टी.ओ. चौकमार्गे पुणे स्टेशनच्या (Pune Station) मार्गाचा वापर करावा. त्याचवेळी इंजिनिअरींग चौकाकडून फक्त न्यायालयात (Shivajinagar Court) जाणार्‍या वाहनांना संचेती चौकातून (sancheti chowk) डावीकडे वळता येणार आहे.

 

महापालिका भवनकडून कुंभारवाडा चौकाकडे जाणार्‍या जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार असून नवीन छत्रपती शाहू महाराज पुलावरून दुहेरी वाहतूक राहील.
या पुलावरून व महापालिका भवन येथून तोफखाना मार्गे राजीव गांधी नगर वसाहतीकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे,
असे वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame) यांनी कळविले आहे.

 

Web Title :- Pune Traffic | Worker statue in Pune, Rajiv Gandhi colony rehabilitation action on Thursday; Changes in traffic lanes near Shivajinagar Court

 

हे देखील वाचा :

Mayor Muralidhar Mohol | महापौरांचा रक्तदानाचा संकल्प पुणेकरांकडून सिद्धीस ! मुरलीधर मोहोळांवर रक्तदानरुपी शुभेच्छांचा वर्षाव, 3860 जणांकडून रक्तदान; लेकीसह महापौरांकडून ‘महादान’ !

Param Bir Singh | परमबीर सिंग यांना मुंबईतील कोर्टाचा मोठा धक्का ! न्यायालयाने दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Pune Treasury Office | निवृत्तीधारकांना आयकर सवलतीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

 

Related Posts