IMPIMP

Nana Patole | ‘कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार येईल’, नाना पटोलेंचा दावा

by nagesh
Nana Patole | nana patole claims that like karnataka congress will defeat bjp in maharashtra too

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – कर्नाटकात (Karnataka Elections) भाजपचा (BJP) दारुण पराभव करुन काँग्रेसने (Congress) ऐतिहासिक विजय मिळवला. आज नव्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. कर्नाटक प्रमाणेच महाराष्ट्रात देखील काँग्रेसचे राज्य येईल असा मोठा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. कर्नाटकमध्ये नव्या पर्वाला सुरुवात झाली असून जनतेच्या आशा आकांशा पूर्ण करण्याचे काम काँग्रसेचे नवे सरकार करेल असा विश्वास नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

भाजपच्या भ्रष्टाचारी, धर्मांध, जातीयवादी सरकारला कंटाळलेल्या जनतेने काँग्रेसला कर्नाटकात घवघवीत यश दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील जनताही परिवर्तन घडवेल आणि राज्यात काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला आहे.

श्री कांतीरावा स्टेडियम बंगरुळू (Sri Kanteerava Stadium Bengaluru) येथे लाखो लोकांच्या साक्षीने सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी मुख्यमंत्री तसेच डी. के. शिवकुमार (DyCM D. K. Shivakumar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची व काँग्रेसच्या आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांसह महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM Prithviraj Chavan), तेलंगणाचे प्रभारी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray), कार्याध्यक्ष नसीम खान (Naseem Khan), माजी मंत्री नितीन राऊत (Nitin Raut), सुनिल केदार (Sunil Kedar), प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde), मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam), मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले, भाजपच्या डबल इंजिन सरकारने कर्नाटकात डबल भ्रष्टाचार केला व जनतेचा पैसा लुटला.
सामान्य जनतेच्या मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करुन केवळ धार्मिक मुद्यांच्या आधारावर मतं मागितली मात्र
कर्नाटकची जनता भाजपच्या भुलथापांना बळी पडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi),
अमित शाह (Amit Shah), भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (President J.P. Nadda) यांच्या भाजपचे मुख्यमंत्री, केंद्रातील मंत्री यांनी प्रचार सभा घेतल्या. मात्र कर्नाटकच्या जनतेवर याचा काहीच परिणाम झाला नाही. महाराष्ट्रातही कटकारस्थान करून आलेले डबल इंजिनचे सरकार जनतेच्या मनातून उतरले आहे. भाजपप्रमाणित शिंदे सरकारचा आगामी निवडणुकीत जनता पराभव करेल, असे नाना पटोले म्हणाले.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

कर्नाटकातील काँग्रेस सरकार (Congress Government) जनतेला दिलेली पाच महत्वाच्या
आश्वासनांची अंमलबजावणी पहिल्या कॅबिनेटपासूनच सुरु होईल. जनतेला दिलेली आश्वासने पाळणारे
काँग्रेस सरकार असून महाराष्ट्रातही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असताना दिलेल्या
आश्वासनानुसार पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेतला होता. राज्यात सध्या असलेले शिंदे सरकार शेतकरी,
कष्टकरी, तरुण, महिला, छोटे व्यापारी यांना उद्ध्वस्त करणारे आहे.
या सरकारला आगामी निवडणुकांत कर्नाटकाप्रमाणेच त्यांची जागा दाखवून जनता काँग्रेसला विजयी करेल.

Web Title : Nana Patole | nana patole claims that like karnataka congress will defeat bjp in maharashtra too

Related Posts