IMPIMP

Nana Patole | ‘प्रकाश आंबेडकर कधीपासून भविष्य सांगणारे झाले?’, ‘त्या’ दाव्यावरुन नाना पटोलेंचा टोला (व्हिडिओ)

by nagesh
 Nana Patole | nana patole reaction after prakash ambedkar statement regarding maharashtra politics bomb blast

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी
रविवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political News) दोन बॉम्बस्फोट होणार असल्याचा खळबळजनक
दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, यावरुन काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana
Patole) यांनी प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला आहे. पुण्यात शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले. यानंतर
नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाना पटोले (Nana Patole) यांना प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या दाव्याबद्दल विचारण्यात आले असता, प्रकाश आंबेडकर कधीपासून भविष्य सांगणारे झाले, मला माहिती नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच आंबेडकरांनी राज्यात दोन राजकीय स्फोट होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे हे स्फोट नेमकं कुठं होतात, ते बघू, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.

 

 

 

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, 15 दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. आणि एक नसून दोन बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राज्यातील सरकार पडणार का? असं विचारलं असता, येत्या 15 दिवसांत सर्वांना सर्वकाही समजेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. शिवसेनेबरोबर (Shivsena) वंचितच्या पदाधिकारी पातळीवर बैठका सुरु
असून आमच्या युतीची काळजी करु नये, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nana Patole | nana patole reaction after prakash ambedkar statement regarding maharashtra politics bomb blast

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply | पुणे महानगरपालिका : लष्कर पाणीपुरवठा केंद्र – बुधवारी कोरेगाव पार्क, हडपसर, मुंढवा, फुरसुंगी इत्यादी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Sunanda Rajendra Pawar | पुणे : स्वतःला कमी लेखू नका, स्वतःच्या हिमतीवर काम करायला शिका; सुनंदाताई राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन

Maharashtra Political News | पक्षाचे अध्यक्ष पुण्यात अन् आमदारांची बैठक मुंबईत, राष्ट्रवादीच्या गोटात चाललयं तरी काय?

 

Related Posts