IMPIMP

Narayan Rane | बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘त्या’ पत्राची होतेय चांगलीच चर्चा

by nagesh
Narayan Rane | Union Minister Narayan Rane's 'that' letter on the occasion of Balasaheb Thackeray's birth anniversary is being discussed a lot

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – आज दि. २३ शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने विविध राजकीय नेते सोशल मिडीयाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे (Shivsena Chief Balasaheb Thackeray) यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत आठवणींना उजाळा देत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी देखील आपल्या ट्वीटरवरून एक पत्र शेअर केले आहे. त्यात त्यांनी (Narayan Rane) स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला असून हे पत्र चांगलेच चर्चेत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या पत्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे लिहतात, बाळासाहेबांच्या निधनाबाबतच वृत्त मी टीव्हीवर पाहिलं. माझ्या ह्रदयात भावनांचा कल्लोळ उसळला होता. त्यांच्यासोबत घालवलेल्या कितीतरी क्षणांच्या आठवणीनं माझे डोळे ओलावले होते. माझ्या आत उचंबळून येणाऱ्या भावना मी कागदावर शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न केला. सेना सत्तेवर आहे की नाही या गोष्टीचा त्यांच्यावर कधीच परिणाम झाला नाही. ते नेहमी आपल्या वागण्या-बोलण्याची शैली तसेच राखून असत. त्यांच्यासारखे खरोखरचं तेच एकमेव होते. त्यांचे व्यक्तीमत्व माझ्या गुरू स्थानी आहे. आणि हे सांगताना मलाही अभिमान वाटत असे. साहेब, आपल्या शेवटच्या दिवसात मला आपल्याला भेटता आलं नाही. याची मला आयुष्यभर खंत राहणार. असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

 

बाळासाहेब अतिशय दयाळू स्वभावाचे होते. ते पक्के राजकारणी कधीच नव्हते. आपलं माणूसपण त्यांनी शेवटपर्यंत जपलं. १९६६ मध्ये मराठी माणसाची एकमेव आशा म्हणून त्यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि नंतर त्यांनी कडव्या हिंदुत्त्वाचा पुरस्कार केला. त्यामुळेच मराठी माणूस आणि माझ्यासारखे तरूण त्यांच्याकडे चुंबकासारखे आकर्षित झाले होते.त्यांनी आपल्या माणसांची नेहमीच काळजी घेतली. दुःखाच्या प्रसंगी विचारपूस करायला ते कधीही विसरले नाहीत. अशा वागणुकीमुळेच ते आपल्या पक्षाचेच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके नेते होते. असे देखील यावेळी त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मला (Narayan Rane) स्वतःला बाळासाहेबांचे खूप प्रेम मिळालं. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला होता. मी आज जो आहे, तो त्यांच्यामुळेच आहे. हे कबूल करण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. माझ्या राजकीय यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आपला भक्‍कम पाठिंबा दिला. म्हणूनच मी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या नऊ महिन्यांच्या कारकीर्दीत लक्षात राहील, असं काम करू शकतो असे देखील नारायण राणे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.

 

 

पुढे त्यांनी लिहिले आहे की, साहेबांचं धैर्य जेवढं जबरदस्त होतं तेवढंच माणसं ओळखण्याचं कौशल्यदेखील कौतुकास्पद होतं. त्याच्याही पलिकडे जाऊन ते जगातल्या अव्वल दर्जाच्या प्रतिभावंत व्यंगचित्रकारांपैकी एक होते. लेखक आणि संपादक म्हणून ते किती उच्च दर्जाचे होते, ते त्यांनी आपल्या ‘सामना’ आणि ‘मार्मिक’ या प्रकाशनांमधून दाखवून दिलं. ३९ वर्षे मला लाभलेल्या त्यांच्या सहवासातल्या आठवणी आणि त्यांनी मला दिलेलं प्रेम याबद्दल लिहिता लिहिता कागद संपून जाईल, पण आठवणी संपणार नाहीत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पक्षातून बाहेर पडणे हा माझा नाईलाज असल्याचेही यावेळी त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.
मी घेतलेल्या निर्णयानं त्यांना खूप यातना झाल्या असणार आणि त्याबद्दल मला आजन्म दुःख राहणार आहे.
पण त्या परिस्थितीत माझा नाईलाज होता. काही लोकांमुळं मला तो निर्णय घेणं भाग पडलं.
आता त्याबद्दल बोलून काही फायदा नाही. असंही हे ते पुढे लिहितात.

 

साहेब, तुम्ही माझ्या आई-वडिलांपेक्षा जास्त प्रेम मला दिलं.
सेना सोडून बाहेर पडल्यावरदेखील तुम्ही मला दोनदा फोन केले.
तुमच्या हृदयाच्या मोठेपणाचा आणखी कोणता पुरावा द्यावा? त्यांची प्रकृती बरी नसताना मला त्यांना भेटायचं होतं.
मात्र, भेट घेता येत नसल्याने मी प्रचंड अस्वस्थ होतो.
त्यांना शेवटचं पाहाण्याची संधी मला मिळू शकली नाही आणि ते आपल्यातून निघून गेले.
साहेब! मी आपल्याला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही. मला क्षमा करा.
असे लिहित नारायण राणे यांनी आपल्या पत्राचा समारोप केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Narayan Rane | Union Minister Narayan Rane’s ‘that’ letter on the occasion of Balasaheb Thackeray’s birth anniversary is being discussed a lot

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून सुरक्षा रक्षक महिलेचा विनयभंग, हिंजवडीमधील घटना

Pandharpur Crime News | पंढरपूरमध्ये 10 वर्षांच्या मुलाचा छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये आढळला मृतदेह

Chandrakant Patil | कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची बैठक, गाफील राहून चालणार नाही; चंद्रकांत पाटलांचा कर्यकर्त्यांना सल्ला (व्हिडिओ)

 

Related Posts