IMPIMP

Nashik Aurangabad Road Accident | नाशिकमध्ये अपघातानंतर बसला भीषण आग, 13 प्रवाशांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर

by nagesh
Nashik Aurangabad Road Accident | reaction of leader of opposition in legislative assembly ajit pawar after the accident in nashik

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन – आज पहाटे नाशिकमध्ये औरंगाबाद रस्त्यावरील रिची चौकात खासगी बसला अपघातानंतर (Nashik Aurangabad Road Accident) अचानक आग लागली. या भीषण अपघातात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. बसला लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झाला. तर 29 जण जखमी झाले. या भीषण (Nashik Aurangabad Road Accident) दुर्घटनेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट करून राज्य सरकारला (State Government) तातडीचा सल्ला दिला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे. (Nashik Bus Fire)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार यांनी म्हटले की, यवतमाळहून मुंबईच्या दिशेने येणार्‍या खासगी बसला औरंगाबाद-नाशिक मार्गावर (Aurangabad-Nashik Highway) अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली!… त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. अपघातातील जखमींना वैद्यकीय उपचार व मृतांच्या नातेवाईकांना सरकारने आर्थिक मदत करावी. अशा अपघातांची पुनरावृत्ती व प्रवाशांचे मृत्यू टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

 

ही भीषण दुर्घटना आज पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी घडली.
बस दुसर्‍या वाहनाला धडकल्याने बसमध्ये अचानक आग लागली. अपघात (Nashik Aurangabad Road Accident) घडला तेव्हा सर्व प्रवासी गाढ झोपेत होते.
बस नाशिकमधील औरंगाबाद रस्त्यावरील रिची चौकात आली असताना अचानक बस आणि आयशर ट्रेलरची समोरासमोर धडक बसली.
यानंतर बसने अचानक पेट घेतला. काही प्रवाशांनी खिडक्यांमधून खाली उडी घेत जीव वाचवला.
पण काही प्रवाशांना अचानक घडलेल्या घटनेमुळे बसमधून बाहरे पडता आले नाही.
त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत तर जखमींचा
संपूर्ण खर्च सरकार करणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्यांनतर, मृतांच्या प्रत्येक नातेवाईकाला PMNRF कडून 2 लाख रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी
(PM Narendra Modi) यांनी जाहीर केली आहे.
तर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Nashik Aurangabad Road Accident | reaction of leader of opposition in legislative assembly ajit pawar after the accident in nashik

 

हे देखील वाचा :

IND Vs PAK In T20 World Cup | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ खेळाडू ठरू शकतो भारताची डोकेदुखी, 12 मॅचमध्ये ठोकल्या 8 फिफ्टी

Jalna ACB Trap | वाळुची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकाकडून 12 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Darryl Mitchell | न्यूझीलंड संघाला मोठा धक्का! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू T-20 वर्ल्डकपमधून OUT

 

Related Posts