IMPIMP

National Pension Scheme (NPS) | दरवर्षी रू. 2 लाखपर्यंत गुंतवणुकीवर वाचू शकतो टॅक्स, निवृत्तीनंतर येणार नाही आर्थिक तंगी !

by nagesh
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाNational Pension Scheme (NPS) | जर तुम्ही करदाते असाल आणि कर वाचवण्याचा मार्ग शोधत असाल, तर एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम तुमच्यासाठी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला निवृत्तीनंतर चांगली पेन्शन मिळते. याशिवाय, तुम्ही दरवर्षी कर सवलतीचा दावा करू शकता. National Pension Scheme (NPS)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कर वाचवण्यासाठी लोक अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. त्यांनी एनपीएसकडे दुर्लक्ष करू नये. तरुणांना निवृत्ती हे दूरचे अंतर वाटू शकते, पण ते जितक्या लवकर त्यात गुंतवणूक करतील तितकी त्यांची पेन्शन चांगली होईल.

 

तसेच, याच्या मदतीने ते भरपूर टॅक्स वाचवून टेक होम सॅलरी वाढवू शकतात. मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात, माय फन बझारचे सीईओ विनीत खंदारे म्हणतात की, एनपीएसमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त कर सवलत मिळू शकते. National Pension Scheme (NPS)

 

या व्यतिरिक्त, तुम्ही NPS मधील फंड व्यवस्थापक आणि निधी वाटप पर्याय देखील निवडू शकता. तुम्ही या 5 कारणांसाठी कर नियोजनात एनपीएसचा समावेश करावा.

 

कर बचत (Tax Saving)
तुम्हाला प्रति वर्ष 2 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळू शकते. टॅक्सबडी डॉट कॉमचे सुजित बांगर म्हणतात की या अंतर्गत तुम्ही 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर कर लाभाचा दावा करू शकता. तसेच, तुम्ही रु. 50,000 पर्यंतच्या अतिरिक्त गुंतवणुकीवर कर लाभ घेऊ शकता.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

EPF ला चांगला पर्याय
एनपीएसमध्ये तुम्ही केवळ कर वाचवत नाही तर निवृत्तीनंतरच्या समृद्ध जीवनासाठी चांगली रक्कमही जमा करता. दीर्घकाळात, अपेक्षा करू शकता की, एनपीएस तुम्हाला ईपीएफओपेक्षा चांगला रिटर्न देऊ शकते.

 

मॅच्युरिटीवर कर नाही
स्कीमची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर, तुम्हाला तुमच्या खात्यातील 60 टक्के रक्कम मिळेल.
तसेच 40 टक्के हिस्सा तुम्हाला मासिक पेन्शन म्हणून दिला जाईल. 60 टक्के हिश्श्यावर सुद्धा कोणताही कर लागणार नाही.

 

फ्लेक्सिबल इन्व्हेस्टमेंट पॅटर्न
तुमच्या इच्छेनुसार तुम्ही गुंतवणूक पॅटर्न आणि फंड मॅनेजर बदलू शकता.
यामुळे हे निश्चित होते की तुम्ही तुमच्या पद्धतीने रिटर्न वाढवू शकता.

 

लॉक – इन पिरियड
तरूणांना याचा लॉक – इन कालावधी थोडासा खटकू शकतो, परंतु दीर्घकालीन विचार करता, त्यांच्यासाठी निवृत्तीनंतरही चांगले उत्पन्नाचा उत्तम पर्याय आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- National Pension Scheme (NPS) | nps along with increasing wealth it will also help in saving tax is a great investment option

 

हे देखील वाचा :

Sangali Crime | पिंपरी-चिंचवडहून जयसिंगपूरला निघालेल्या कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

Corona in Maharashtra | ‘नागरिकांनाे काळजी घ्या !’ महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 1300 पार; मास्क वापरण्याचं सरकारचं आवाहन

Devendra Fadnavis | कोण संजय राऊत? उलट सुलट बोलतात त्यावर मी का उत्तर देऊ; फडणवीस यांनी साधाला निशाणा (VIDEO)

 

Related Posts