IMPIMP

NCP And Shivsena On Shrikant Eknath Shinde | एक तर हे सरकारच बेकायदा, त्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अजून एक बेकायदा माणूस! शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाईकडून टीका

by nagesh
NCP And Shivsena On Shrikant Eknath Shinde | NCP shivsena slams cm eknath shinde on shikant shinde viral photo

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन NCP And Shivsena On Shrikant Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा
पूत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Eknath Shinde) वडीलांच्या कार्यालयातील खुर्चीत बसले असतानाचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
यावरून राजकीय क्षेत्रात तसेच सोशल मीडियात मोठी चर्चा सुरू आहे. या फोटोवरून आता विरोधकांनी सरकारला आणि विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ
शिंदेंना घेरण्यास सुरुवात केली आहे. (NCP And Shivsena On Shrikant Eknath Shinde)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे बसून काही कागदपत्र तपासत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे राज्याचा कारभार सांभाळत आहेत का? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.

श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले असल्याचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी ट्विटरवरून शेअर केला होता. यात त्यांनी म्हटले आहे की, हा फोटो मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील कार्यालयातील आहे. या फोटोमध्ये कार्यालयात काही लोक मुख्यमंत्र्यांच्या टेबलासमोर उभे असल्याचे दिसत आहे. हे प्रशासकीय अधिकारी असावेत. (NCP And Shivsena On Shrikant Eknath Shinde)

रविकांत वरपे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांचे हे शासकीय निवासस्थान (Government Residence) आहे. मागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असे लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा सन्मान त्यांच्या कुटुंबीयांनी आणि सगळ्यांनीच ठेवायचा असतो. तुम्हाला इतर शासकीय भेटीगाठी किंवा अनौपचारिक भेटी घ्यायच्या असतील, तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या बाजूला बसून तुम्ही त्या घ्या. ती महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या स्वाभिमानाची खुर्ची आहे.

शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे (Dr. Manisha Kayande) यांनी या फोटोवरून एकनाथ शिंदेंना लक्ष्य करताना म्हटले आहे की, हा फोटो सकाळपासून व्हायरल होत आहे. कशा पद्धतीने हे सगळे सुरू आहे ते दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर त्यांचे चिरंजीव बसले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारमध्ये मंत्री असताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) किती अदबीने वागले हे आपण पाहिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर त्यांच्या मुलाने बसणे हे चुकीचे आहे. एक तर हे सरकारच बेकायदा असून गैरमार्गाने आले आहे. त्या खुर्चीवर अजून एक बेकायदा माणूस बसला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रिपाइं खरात गटाकडून सचिन खरात (Sachin Kharat) यांनी टीका करताना म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून त्या पदाचा कार्यभार सांभाळत असल्याचे व्हायरल फोटोवरून दिसत आहे. हे चुकीचे आहे. हा भारतीय संविधानाचा अपमान आहे. या कृत्याबद्दल आपण महाराष्ट्राच्या जनतेच दिलगिरी व्यक्त करावी.

दरम्यान, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (BJP Leader Sudhir Mungantiwar)
यांनी मुख्यमंत्री पूत्राचे समर्थन करताना म्हटले की, शिवसेनेचा एक नेता राष्ट्रवादीच्या
नेत्यासाठी कशा पद्धतीने खुर्ची घेऊन धावत गेला,
हेही महाराष्ट्राने पाहिले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि त्यांचे सुपुत्र सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi)
समोर किती वाकून अभिवादन करत होते, हेही महाराष्ट्राने पाहिले आहे.
आता अडीच वर्षांत काय केले,हे सांगण्यासारखे नसल्यामुळे कोण कुणाच्या खुर्चीवर बसले आहे त्यावर बोलत आहेत.

मुनगंटीवार म्हणाले, त्या खुर्चीवर कुणी एखादी व्यक्ती बसली, तर त्यात आक्षेपार्ह काहीच नाही.
स्टेट वाईल्डलाईफ बोर्डाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तुम्ही उपाध्यक्ष म्हणून ही बैठक चालवायची आहे.
त्यामुळे त्या खुर्चीवर मी बसलो, तर काहीतरी चुकले आहे, असा त्याचा अर्थ होत नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- NCP And Shivsena On Shrikant Eknath Shinde | NCP shivsena slams cm eknath shinde on shikant shinde viral photo

हे देखील वाचा :

Mumbai AC Local Luggage Rack Crashed | एसी लोकलमधील लगेज रॅक कोसळला; पश्चिम रेल्वेने घेतली गंभीर दखल

Dasara Melava 2022 | ‘…तर आम्ही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा साजरा केला असता, BKC मैदान ‘मातोश्री’च्या जास्त जवळ’; शिंदे गटाची प्रतिक्रिया

BJP MLA Nitesh Rane | ‘आदित्यसेनेला टक्केवारी देणार्‍या बिल्डरांवर कारवाई करा’ – नितेश राणे

Related Posts