IMPIMP

NCP Chief Sharad Pawar On Vedanta Foxconn Project | शरद पवारांनी वेदांता-फॉक्सकॉनवरून मोदी-शिंदेंना सुनावले, म्हणाले – ‘हे तर रडणार्‍या लहान मुलाला मोठा फुगा दाखवण्यासारखं’ (Video)

by nagesh
NCP Chief Sharad Pawar On Vedanta Foxconn Project | NCP chief sharad pawar attacks cm eknath shinde and devendra fadnavis over vedanta foxconn project went to gujrat

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  NCP Chief Sharad Pawar On Vedanta Foxconn Project | महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवल्याने सध्या शिंदे-फडणवीस सरकारसह मोदी सरकारविरोधात महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षांनी सुद्धा सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडले आहे. आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. मोदी-शिंदेंना सुनावताना शरद पवारांनी म्हटले की, फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यामुळे त्यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ हे बोलणे म्हणजे रडणार्‍या लहान मुलाला मोठा फुगा दाखवण्यासारखे आहे. हा प्रकल्प गुजरातला जाणे हे दुर्दैव आहे. पवार पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (NCP Chief Sharad Pawar On Vedanta Foxconn Project)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला आहे आणि आता तो परत येण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही चर्चा आता बंद करुन नवीन काय करता येईल ते पाहायला हवे. खरेतर आधीच्या सरकारमध्ये उदय सामंत आणि एकनाथ शिंदे मंत्री होते आणि तेच आता आरोप करत आहेत. महाराष्ट्राला सक्षम नेतृत्वामुळे गुंतवणूक मिळायची. (NCP Chief Sharad Pawar On Vedanta Foxconn Project)

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधताना पवार पुढे म्हणाले, फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यामुळे त्यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ हे बोलणे म्हणजे रडणार्‍या लहान मुलाला मोठा फुगा दाखवण्यासारखे आहे. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र नेहमीच प्रथम क्रमांकावर होता. पण फॉक्सकॉनसारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जातो हे खरेच दुर्दैवी आहे.

 

 

 

पवार म्हणाले, राज्यात शिंदे- फडणवीस सरकारचा (Shinde Fadnavis Government) कारभार अजून दिसतच नाही. सर्व यंत्रणा थंड झाल्या आहेत का असा प्रश्न मनात येतो.
आताही फक्त काय झाडी, काय डोंगर हेच ऐकायला मिळत आहे.
महाराष्ट्रावर राज्यकर्त्त्यांचे लक्ष आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रकल्प गुजरातला गेला, आता चर्चा करुन काही उपयोग नाही.
तरीही पंतप्रधानांनी प्रकल्प महाराष्ट्रात परत आणला तर त्यांचे स्वागत करु.
पण आता नवे काय करता येईल ते पाहायला हवे. दोन्ही बाजूंनी दूषणं देणे बंद केले पाहिजे.
मग ते सरकार असो किंवा मग विरोधी पक्ष. सगळ्यांनी महाराष्ट्रातील वातावरण सुधारले पाहिजे.

 

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar On Vedanta Foxconn Project | NCP chief sharad pawar attacks cm eknath shinde and devendra fadnavis over vedanta foxconn project went to gujrat

 

हे देखील वाचा :

Pune Police Inspector Transfer | पुणेकर पोलिस सुद्धा ‘जगात भारी’; बदली झालेल्या साहेबाला दिल्या ‘पुणेरी स्टाईल’ने शुभेच्छा, व्हॉट्सअ‍ॅप झाला व्हायरल

Vedanta Foxconn Project | वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा; म्हणाले – ‘तो प्रकल्प परत आणा…’

MNS – BJP | देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात मनसेने थोपटले दंड; मनसे नेते म्हणाले – ‘भाजपाला आता लोक कंटाळले’

 

 

Related Posts