IMPIMP

Vedanta Foxconn Project | वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा; म्हणाले – ‘तो प्रकल्प परत आणा…’

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar reaction on shinde fadnavis governments on award announced of marathi translation of kobad gandhi original english book was cancelled

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Vedanta Foxconn Project | महाराष्ट्रात येणारा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प दुर्लक्ष केल्यामुळे गुजरातला जात असेल, तर कदापी खपवून घेतले जाणार नाही. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुन्हा हा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावे. हा प्रकल्प राज्यातून जात असताना गाजर दाखवण्याचे काम करू नये. महाराष्ट्रात येणारा प्रकल्प दुर्लक्षामुळे बाहेर जात असेल, तर कदापी खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. (Vedanta Foxconn Project)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

1 लाख 66 हजार रुपयांची गुंतवणुकीचा महाराष्ट्रात येणारा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने पूरक छोटे उद्योग, कोट्यवधीचा महसूल आणि लाखोंचा रोजगार बुडाल्याने महाराष्ट्रातील जनतेत संतापाचे वातावरण आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे. आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडवणीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) हल्लाबोल केला आहे. (Vedanta Foxconn Project)

 

अजित पवार म्हणाले की, देशात बेरोजगारी, महागाई वाढली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 2 लाख कोटींची गुंतवणूक आणि 2 लाख रोजगार महाराष्ट्रात निर्माण होणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्र सरकारशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या कार्यकाळात हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले.

 

पवार पुढे म्हणाले, वेदांत-फॉक्सकॉन कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्राला निवडले होते.
मात्र, आता गुजरातचे नाव समोर येत आहे. महाराष्ट्रात येणारा प्रकल्प दुर्लक्षामुळे बाहेर जात असेल,
तर कदापी खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी हा प्रकल्प परत आणण्यासाठी प्रयत्न करावे. हा प्रकल्प राज्यातून जात असताना गाजर दाखवण्याचे काम केले जात आहे.

 

रिफायनरी प्रकल्पाबाबत अजित पवार म्हणाले, तोही प्रकल्प राज्यात व्हावा.
राज्याला रोजगार, गुंतवणूक, देशाला आणि राज्याला जीएसटी मिळेल, असे प्रकल्प आले पाहिजेत.
हे प्रकल्प येताना विरोधक आणि सत्ताधार्‍यांनी राजकारण करू नये.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Vedanta Foxconn Project | NCP leader ajit pawar on shinde fadnavis government over vedant project

 

हे देखील वाचा :

MNS – BJP | देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात मनसेने थोपटले दंड; मनसे नेते म्हणाले – ‘भाजपाला आता लोक कंटाळले’

Pune Crime | विमाननगर परिसरातील सराईत गुन्हेगार जितेंद्र भोसलेसह टोळीवर मोक्का, पो.आयुक्त अमिताभ गुप्तांची कारवाई

Nerve Weakness – Vein Pain | कमजोर नसांमध्ये नेहमी होत असतील वेदना तर ‘या’ 5 फळांच्या सेवनाने मिळेल आराम, डाएटमध्ये करा समावेश

 

Related Posts