IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | अहमदनगर दंगलीवरुन शरद पवारांचा गंभीर आरोप, म्हणाले- ‘काही शक्ती धर्माच्या नावाने…’ (व्हिडिओ)

by nagesh
NCP Chief Sharad Pawar | sharad pawar comment on shevgaon riots in ahmednagar mention karnataka example

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाईन – अहमदनगरमध्ये काही शक्ती धर्माच्या नावाने अंतर वाढवून दंगली (Ahmednagar Riots) घडवत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केला. यावेळी त्यांनी कर्नाटकचं उदाहरण देत तेथेही त्या लोकांनी सत्तेचा वापर करुन द्वेष पसरवल्याचा आरोप करत जनतेने त्यांना धडा शिकवल्याचे सांगत शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडलं. तसेच कर्नाटकात होऊ शकतं, तर देशातील कोणत्याही राज्यात होईल यासाठी प्रयत्न करणं आपली जबाबदारी असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं.

हमाल माथाडी कामगारांचे (Hamal Mathadi Workers) 21 वे अधिवेशनाचे आज अहमदनगर येथे उद्घाटन शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, धर्माच्या नावाने अंतर वाढवलं जात आहे. हा नगर जिल्हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक ऐतिहासिक काम करणारे मान्यवर या जिल्ह्यात होऊन गेले. याच नगर जिल्ह्यात शेवगावला दोन ते तीन दिवस बाजारपेठ बंद होती.

 

काही शक्ती जाती-जातीत अंतर वाढवून संघर्ष वाढवत आहे. त्या शक्तीशी लढाई करणं, संघर्ष करण्याचं आव्हान माझ्यासह तुमच्यासह सर्वांवर आहे. हे केलं नाही, तर कष्ट करणाऱ्यांचं जीवन उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आपण तयारी केली पाहिजे, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

कर्नाटकातील (Karnataka Government) सत्तांतरावर बोलताना शरद पवार म्हणाले, देशातील चित्र बदलत आहे.
काल मी बंगळुरूमध्ये होतो. तिथं नवं सरकार आलं आहे.
तिथं अनेक वर्ष काही लोकांचं राज्य होतं. त्या लोकांनी त्यांच्या सरकारच्या काळात माणसांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं.
सर्व देशाला वाटत होतं की, कर्नाटकची निवडणूक (Karnataka Election) सत्ताधारी भाजप जिंकणार.
परंतु काल शपथविधी झाला आणि सामान्य माणसाचं सरकार सत्तेत आलं.
कालच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला 70 टक्के तरुण आणि अनेक जातीधर्माचे लोक उपस्थित होते, असे शरद पवार म्हणाले.

Web Title : NCP Chief Sharad Pawar | sharad pawar comment on shevgaon riots in ahmednagar mention karnataka example

Related Posts