IMPIMP

NEET Exam 2022 | ‘नीट’ परीक्षा 17 जुलैला होणार; प्रवेशपत्र जारी, जाणून घ्या

by nagesh
Maharashtra Monsoon Session | mpsc exam and bed cet exams on same day both exams on august 21 govt gave solution

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन NEET Exam 2022 | वैद्यकीय प्रवेशांसाठी राष्ट्रीय स्तरावरून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) (NEET Exam 2022) 17 जुलै रोजी होणार आहे. या परिक्षेसाठी प्रवेशपत्र मंगळवारी जारी करण्यात आले आहे. अर्ज क्रमांक व जन्मतारीख सबमिट करून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. याबाबत माहिती राष्ट्रीय चाचणी एजन्सीने (NTA) दिली आहे.

 

नीट परीक्षा देशातील 497 शहरांमध्ये रविवारी (17 जुलै) रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5.20 या वेळेत होईल. प्रवेशपत्र दाखवल्याशिवाय विद्यार्थ्यांना केंद्रावर प्रवेश दिला जाणार नसल्याचं एनटीएकडून सांगण्यात आले आहे. तसेच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ehttps://neet.nta.nic.in/ या वेबसाइटद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळू शकणार आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एनटीएच्या माहितीनुसार, प्रवेशपत्रासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी 011-40759000 या क्रमांकावर किंवा [email protected]. या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. या दोन्ही माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडवण्यात येतील.

 

नियमावली काय आहे ?

पावसाची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशी वेळेआधीच केंद्रांवर उपस्थित राहणे आवश्यक.

‘नीट’ परीक्षा ज्या शहरांत होणार आहे, त्या शहरांमधील केंद्रांची यादी यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

काही विद्यार्थ्यांनी एनटीएकडे परीक्षा केंद्र आणि शहर बदलण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीनुसार त्यांचे केंद्र बदलण्यात आले आहे.

आता कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलले जाणार नाहीत.

 

Web Title :- NEET Exam 2022 | neet exam 2022 neat exam on july 17

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | गुरुपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली; जाणून घ्या आजचे दर

Maharashtra Rain Update | राज्यात ‘धो-धो’ ! मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

Maharashtra Political Crisis | ‘सर्वोच्च न्यायालयाने कोणालाही दिलासा दिलेला नाही, संभ्रम निर्माण केला जातोय’ – शिवसेना खासदार संजय राऊत

 

Related Posts