IMPIMP

NSDR Technique For Relaxation | झोपून उठल्यानंतर सुद्धा थकवा जाणवतो का? गुगल सीईओ सुंदर पिचाई यांचे हे टेक्निक येईल उपयोगी

by nagesh
NSDR Technique For Relaxation | sleeping tricks google ceo sundar pichai follow nsdr technique for relaxation know his good deep sleep mantra

सरकारसत्ता ऑनलाइन – आजच्या धकाधकीच्या जीवनात शांतता मिळणे (Sleeping Tricks) कठीण झाले आहे. लोक कामानंतर येतात आणि थकल्यामुळे झोपी जातात (NSDR Technique For Relaxation), पण आराम मिळत नाही. अनेकदा झोपेतून उठल्यानंतरही लोकांना खूप थकवा (Fatigue) जाणवतो. आराम मिळण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात, काहींना गाणी ऐकून फ्रेश वाटते तर काही योग-ध्यानातून (Yoga-Meditation) मन शांत करण्याचा प्रयत्न करतात. अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai, CEO of Google And Alphabet) यांच्याबद्दल सांगणार (NSDR Technique For Relaxation) आहोत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी सांगितले की, ते स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी काय करतात (How To Relax Yourself). स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी सुंदर पिचाई यांचे हे तंत्र तुमच्यासाठीही उपयुक्त ठरू शकते. वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी सांगितले की, ते स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी नॉन स्लीप डीप रेस्ट (Non Sleep Deep Rest – NSDR) तंत्राचा अवलंब करतात. NSDR तंत्र काय आहे जाणून घेवूयात (NSDR Technique For Relaxation)…

 

काय आहे NSDR तंत्र (What is NSDR Technique)
हे करण्यासाठी, आपल्याला डोळे मिटून जमिनीवर झोपावे लागते. यानंतर आपले शरीर आणि हात आणि पाय शिथिल करा. मग तुमचे लक्ष कोणत्याही एका गोष्टीवर केंद्रित करा. यामध्ये तुम्ही मोकळे निळे आकाश किंवा अंधार्‍या खोलीचा विचार करू शकता. यादरम्यान श्वासोच्छवासाकडे (Breathing) आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांतील संवेदनांकडे लक्ष द्या.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सुंदर पिचाई म्हणाले, मला ध्यान करणे खूप कठीण वाटते, त्यामुळे मी यूट्यूबवर एनएसडीआर व्हिडिओ प्ले करून रिलॅक्स होतो. एनएसडीआरद्वारे, तुम्हाला डिप रेस्ट (Deep Rest) मिळते, जी सहसा झोपेतून मिळत नाही.

 

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. ह्युबरमन लॅब (Dr. Huberman Lab) यांनी सांगितले की, एनएसडीआर तंत्र अनेक लोकांना आकर्षित करते, ज्यांना ध्यान करण्याची सवय नाही.

 

डॉ. ह्युबरमन यांनी सांगितले की, तेही अनेक दिवसांपासून हे तंत्र अवलंबत आहेत. ज्या लोकांना झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी हे तंत्र खूप प्रभावी ठरू शकते. डॉ. ह्युबरमन यांनी सांगितले की, या तंत्राने झोप लवकर येते, तसेच तणावही कमी होतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हा आहे सुंदर पिचाई यांचा फिटनेस मंत्र (Sundar Pichai’s Fitness Mantra)
वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी सांगितले की, ते दररोज 6 ते 7 तासांची झोप घेतात,
त्यानंतर ते सकाळी 6.45 आणि 7.30 वाजता उठतात.
सुंदर पिचाई गेल्या 15 वर्षांपासून फक्त एकच नाश्ता करतात आणि तो म्हणजे अंडी-टोस्ट आणि गरम चहा (Egg-Toast And Hot Tea).
नाश्त्याच्या वेळी बातम्या वाचणे हे सुंदर पिचाई यांचे इतर महत्त्वाच्या कामांपैकी एक काम आहे.

 

याशिवाय सुंदर पिचाई यांनी असेही सांगितले की, मेडिटेशनपेक्षा वॉकिंग (Walking) त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
ते म्हणाले की चालताना विविध गोष्टींचा चांगल्याप्रकारे विचार करूशकतात.

 

Web Title :- NSDR Technique For Relaxation | sleeping tricks google ceo sundar pichai follow nsdr technique for relaxation know his good deep sleep mantra

 

हे देखील वाचा :

Maggi, Coffee And Tea Price Increased | मॅगी, कॉफी आणि चहा महागला ! 9 ते 16 टक्केपर्यंत वाढली किंमत, जाणून घ्या नवीन प्राईस

Black Salt Health Benefits | चिमुटभर काळे मीठ नष्ट करू शकते शरीरातील धोकादायक बॅक्टेरिया, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Side Effect Of Feeder Milk And Sipper Cup | तुमचं बाळ प्लॅस्टिकच्या बाटलीतून दूध पित असेल तर सावधान; जाणून घ्या ‘हे’ भयानक सत्य

 

Related Posts