IMPIMP

Online Ration Card | रेशन कार्डसाठी करा ऑनलाईन अर्ज; घर बसल्या करू शकता ‘हे’ काम, जाणून घ्या

by nagesh
Online Ration Card | follow this process to apply for a ration card

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Online Ration Card | रेशनकार्ड (Ration Card) हे देशातील नागरीकांचे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. रेशनकार्डवर देशातील सर्वसामान्य नागरीकांना माफक दरात धान्य दिले जातेय. त्याचबरोबर इतर अनेक योजनांचा लाभ घेऊ शकता. ज्याच्याकडे रेशन कार्ड नाही त्याला याचा लाभ घेता येत नाही. दरम्यान आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. घरबसल्या बनवलेले रेशनकार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज (Online Ration Card) करता येणार आहे. रेशन कार्डसाठी अर्ज करणे खूप सोपे आहे. याबाबत अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल. याबाबत जाणून घ्या.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय लागेल कागदपत्रे ?
रेशन कार्डसाठी तीन पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्डची छायाप्रत, पॅन कार्डची छायाप्रत, चालक परवाना, मतदार ओळखपत्र, अर्जदाराच्या नावावर चालू टेलिफोन बिल, अर्जदाराच्या नावावर एलपीजी कार्ड, मनरेगा जॉब कार्डची छायाप्रत, सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांद्वारे जारी केलेले ओळखपत्र इत्यादीची आवश्यकता लागते. तसेच, आर्थिक निकषानुसार ३ विविध रेशन कार्ड दिले जातात. वर्षाला दहा हजारांचे उत्पन्न असलेल्यांना बीपीएल (BPL- Below Poverty Line) कार्ड. अशी कागदपत्रे लागणार आहेत. (Online Ration Card)

या दरम्यान, दहा हजारांपेक्षा जादा उत्पन्न असलेल्या APL (Above Poverty Line) कार्ड आणि निश्चित उत्पन्न नसलेल्यांना AAY कार्ड जारी केले जातेय. रेशन कार्डमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव असते. तुम्ही घरातील इतर सदस्यांच्या नावाचाही समावेश करू शकणार आहात.

ऑनलाइन प्रक्रिया काय आहे ?
पोर्टलला भेट देऊन, तुम्ही ऑनलाइन रेशन कार्डसाठी अर्ज करा वर क्लिक करा येथे तुम्ही तुमचा तपशील भरा. त्यानंतर सरकारी अधिकारी तुमची पात्रता तपासतील. जर तुम्ही दिलेली माहिती बरोबर असेल तर तुम्हाला रेशनकार्ड नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाते.

Web Title :- Online Ration Card | follow this process to apply for a ration card

हे देखील वाचा :

Natural Teeth Whiteners Fruits | पाच पदार्थ आणि फळं, ज्याच्या सेवनाने तुमचे दात चमकतात

Rupee Slumps All Time Low | डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर; तुमच्या खिशाचे काय होईल? जाणून घ्या

Sanjay Raut | 21 आमदारांशी संपर्क ! विजय महाविकास आघाडीचा असेल; संजय राऊतांच्या एकाचवेळी दोन भूमिका

Related Posts