IMPIMP

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ ! क्रिकेट सट्टेबाज सोनू जालाननं नोंदवला CID कडे जबाब

by nagesh
parambir singh asked pay rs 10 cr cricket bookie sonu jalan statement cid

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून तुर्तास दिलासा मिळाला होता. त्यानंतर आज पुन्हा परमबीर सिंग यांच्यावर नवा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट सट्टेबाज सोनू जालान याने आरोप केले असून त्याने स्वत: हून सीआयडीकडे जाऊन आपला जबाब नोंदवला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, ED कडून निकटवर्तीयाच्या घरावर छापा

सोनू जालान याने गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) नोंदवलेल्या जबाबानुसार, एखाद्या मोठ्या प्रकरणात जर अटक टाळायची असेल तर माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना 10 कोटी रुपये दे असे परमबीर सिंग यांनी मला सांगितलं होतं. असा जबाब सोनू जालान याने दिला आहे.

कर्जत-जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार; मिरजगाव व खर्डा येथे वखार उभारणीस मान्यता, आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

जालान याने परमबीर सिंह( Parambir Singh), प्रतीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार यांच्यावर वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपांची सध्या सीआयडी चौकशी करत आहेत. या प्रकरणी परमबीर सिंह आणि प्रदीप शर्मा यां दोघांनी सोनू जालान याच्या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

सोनू जालान याने आपल्या जबाबात सांगितले की, मे 2018 मध्ये एका सट्टेबाजीच्या प्रकरणात ठाणे पोलिसांच्या ‘अँटी एक्स्टॉर्सन सेल’ने त्याला अटक केली होती. त्यानंतर आपल्याला तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह Parambir Singh यांच्याकडे नेण्यात आले होते. सिंह यांनी मला भारतातील सक्रिय क्रिकेट सट्टेबाजी करणाऱ्यांची माहिती विचारली. तसंच मला कुटुंबियातल्या सदस्यांसह एका मोठ्या प्रकरणात अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे अटकेपासून बचाव करायचा असेल तर प्रदीप शर्मा यांनी 10 कोटी देण्यास सांगितल्याचा आरोप जालान याने जबाबात केला आहे.

Also Read :

Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

पुण्यातील माजी नगरसेवक भीमराव खरात यांचे निधन

Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED करणार बारमालकांची चौकशी, 5 जणांना समन्स

Related Posts