IMPIMP

Param Bir Singh | परमबीर सिंग यांना मुंबईतील कोर्टाचा मोठा धक्का ! न्यायालयाने दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

by nagesh
Param Bir Singh | non bailable warrant issued against param bir singh in connection with extortion cases

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन वरिष्ठ आयपीएस अधिकारी (Senior IPS Officer) आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Former CP) परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्याविरुद्ध मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने (Magistrate Court) अटक वॉरंट (Arrest warrant) काढले आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधातील हे आतापर्यंतचे तिसरे वॉरंट आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्याविरुद्ध खंडणीचा (Ransom) गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याप्रकरणी ते न्यायालयात हजर होत नसल्याने न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे.
यापूर्वी मुंबई व ठाणे (Thane) येथील खंडणी प्रकरणात (Ransom case) त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे.
आतापर्यंत त्यांच्याविरुद्ध तीन अटक वॉरंट काढले असून परमबीर यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे.

 

मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station) परमबीर सिंग यांच्यासह सात अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणात सीआयडीने (CID) पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे (Police Inspector Nandkumar Gopale) आणि पोलीस निरीक्षक आशा कोरके
(Police Inspector Asha Korke) यांना सोमवारी अटक केली आहे.
कोरके हे सध्या खंडाळा पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये (Khandala Police Training Center) कार्यरत आहेत.
तर गोपाळे नायगाव (Local Weapons Unit Naigaon) येथील स्थानिक शस्त्रास्त्र युनिटमध्ये आहेत.
या दोघांच्या अटकेनंतर या प्रकरणातील इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Param Bir Singh | non bailable warrant issued against param bir singh in connection with extortion cases

 

हे देखील वाचा :

Pune Treasury Office | निवृत्तीधारकांना आयकर सवलतीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

Bombay High Court | आरोप करण्याआधी शहानिशा केली होती का? ‘समीर वानखेडेंच्या विरोधात बोलण्यास बंदी घालता येणार नाही, पण…’

Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांनी अनुभवला ‘जय भीम’ चित्रपट

Pune News | रक्तदान शिबिरातून महापौरांनी पुणेचं नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राला आदर्श घातला – लहू बालवडकर

 

Related Posts