IMPIMP

PDCC Election Results | पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार यांना मोठा धक्का? भाजपचे प्रदीप कंद विजयी, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच विजयाची नोंद, जाणून घ्या कोणाला किती मतं पडली

by nagesh
PDCC Election Results | Big blow to NCP leader Ajit Pawar in Pune District Bank elections? BJP’s Pradip Kanda wins

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – PDCC Election Results | राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोडून भाजपमध्ये (BJP) केलेल्या प्रदीप कंद (Pradip Kand) यांना उद्देशून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या अशा शब्दात निवडणुक प्रचारात टिका केली होती. त्यामुळे या बहुचर्चित निवडणुकीचे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यात प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश घुले (Suresh Ghule) यांचा जिल्हा बँकेच्या क वर्ग सहकारी बँका व पतसंस्था गटात १४ मतांनी पराभव केला. (PDCC Election Results)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुळशी (Mulshi), हवेली (Haveli) पाठोपाठ या गटातही सुरेश घुले यांच्यासारख्या प्रस्थापितांना पराभवाची चव चाखावी लागली असून अजित पवार यांना हा धक्का असल्याचे मानले जात आहे. (PDCC Election Results)

प्रदीप कंद यांना ४०५ तर सुरेश घुले यांना ३९१ मते मिळाली. विशेष म्हणजे पवार यांच्या बारामतीमध्ये (Baramati) कंद यांना निर्णायक ५२ मते मिळाल्याने कंद यांचा विजय साकार होऊ शकला आहे. प्रदीप कंद यांच्या विजयामुळे भाजपाने जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (pune district central cooperative bank election) यंदा प्रस्थापित असलेल्या जुन्या संचालकांना पराभवा सामना करावा लागला आहे. सलग २२ वर्षे संचालक असलेले आणि माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे (atmaram kalate) आणि १५ वर्षे संचालक असलेले प्रकाश म्हस्के (prakash mhaske) यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे.

मुळशी तालुका मतदारसंघातील मतमोजणीत आत्माराम कलाटे यांना १७ मते मिळाली तर सुनिल चांदेरे (Sunil Chandere ) यांनी २८ मते मिळवून विजय मिळविला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हवेली तालुका अ वर्ग प्रतिनिधी गटात गेल्या ३ निवडणुकांमध्ये विजय मिळविलेले प्रकाश म्हस्के हे चौथ्यांदा निवडून जाण्यासाठी तयार होते. मात्र, त्यांचे हे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत झालेल्या या लढतीत विकास दांगट (Vikas Dangat) यांनी ७३ मते मिळविली तर प्रकाश म्हस्के यांना ५९ मते मिळविता आली.
दांगट यांनी म्हस्के यांचा १४ मतांनी पराभव केला.

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या २१ जागा असून त्यापैकी १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
तर ७ जागांसाठी २ जानेवारी रोजी मतदार पार पडले होते.

 

Web Title: PDCC Election Results | Big blow to NCP leader Ajit Pawar in Pune District Bank elections? BJP’s Pradip Kanda wins

 

हे देखील वाचा :

PDCC Election Results | पीडीसीसी बँक निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का ! सलग 22 वर्षे संचालक असलेले आत्माराम कलाटे, 15 वर्षे संचालक असलेले प्रकाश म्हस्के पराभूत; सुनिल चांदेरे, विकास दांगट विजयी

Cordelia Cruise-Covid-19 | आर्यन खान प्रकरणातील कॉर्डेलिया क्रूझवर कोरोनाचा ‘विस्फोट’ ! 66 प्रवाशांना कोरोनाची लागण, गोवा सरकारने प्रवेश नाकारला

Gold Silver Price Today | सुवर्णसंधी ! आजही सोन्या-चांदीच्या किंमती कमी; जाणून घ्या मुंबई, पुणे अन् नागपूरमधील आजचे दर

 

Related Posts