IMPIMP

PDCC Election Results | पीडीसीसी बँक निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का ! सलग 22 वर्षे संचालक असलेले आत्माराम कलाटे, 15 वर्षे संचालक असलेले प्रकाश म्हस्के पराभूत; सुनिल चांदेरे, विकास दांगट विजयी

by nagesh
PDCC Election Results | PDCC Bank pushes incumbents in elections! Atmaram Kalate, who has been the director for 22 consecutive years and Prakash Mhaske, who has been the director for 15 years are defeated; Sunil Chandere, Vikas Dangat won

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPDCC Election Results | पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (pune district central cooperative bank election)यंदा प्रस्थापित असलेल्या जुन्या संचालकांना पराभवचा सामना करावा लागला आहे. सलग २२ वर्षे संचालक असलेले आणि माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे (atmaram kalate) आणि १५ वर्षे संचालक असलेले प्रकाश म्हस्के (prakash mhaske) यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. (PDCC Election Results)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुळशी तालुका (Mulshi) मतदारसंघातील मतमोजणीत आत्माराम कलाटे यांना १७ मते मिळाली तर सुनिल चांदेरे (Sunil Chandere ) यांनी २८ मते
मिळवून विजय मिळविला आहे. (PDCC Election Results)

 

 

हवेली (Haveli) तालुका अ वर्ग प्रतिनिधी गटात गेल्या ३ निवडणुकांमध्ये विजय मिळविलेले प्रकाश म्हस्के हे चौथ्यांदा निवडून जाण्यासाठी तयार होते. मात्र, त्यांचे हे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत झालेल्या या लढतीत विकास दांगट (Vikas Dangat) यांनी ७३ मते मिळविली तर प्रकाश म्हस्के यांना ५९ मते मिळविता आली. दांगट यांनी म्हस्के यांचा १४ मतांनी पराभव केला.

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या २१ जागा असून त्यापैकी १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर ७ जागांसाठी २ जानेवारी रोजी मतदार पार पडले. आज सकाळपासून अल्पबचत भवन येथे मतमोजणी सुरु झाली असून पहिल्या टप्प्यात २ जागांचे निकाल बाहेर आले आहेत. उर्वरित जागांची मतमोजणी सुरु आहे.

 

Web Title: PDCC Election Results | PDCC Bank pushes incumbents in elections! Atmaram Kalate, who has been the director for 22 consecutive years and Prakash Mhaske, who has been the director for 15 years are defeated; Sunil Chandere, Vikas Dangat won

 

हे देखील वाचा :

Cordelia Cruise-Covid-19 | आर्यन खान प्रकरणातील कॉर्डेलिया क्रूझवर कोरोनाचा ‘विस्फोट’ ! 66 प्रवाशांना कोरोनाची लागण, गोवा सरकारने प्रवेश नाकारला

Gold Silver Price Today | सुवर्णसंधी ! आजही सोन्या-चांदीच्या किंमती कमी; जाणून घ्या मुंबई, पुणे अन् नागपूरमधील आजचे दर

Gold Price Today | खुशखबर ! आज चांदीच्या किमतीत मोठी घसरण, सोने सुद्धा झाले स्वस्त, जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

 

Related Posts