IMPIMP

‘मुंबईत मुकेश अंबानींसारख्या व्यक्ती असुरक्षित’, नारायण राणेंनी लिहीलं HM अमित शाहांना ‘लेटर’

by pranjalishirish
' Narayan Rane People like Mukesh Ambani insecure in Mumbai', Narayan Rane writes 'letter' to HM Amit Shah

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – सचिन वाझे Sachin Vaze यांच्या अटकेनंतर राज्याच्या पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh  यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून करण्यात आली होती. त्यातच आता भाजपचे खासदार नारायण राणे Narayan Rane यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.या बाबतीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री यांना एक पत्रसुद्धा लिहिले आहे.

Sachin Vaze Case : माजी खासदार संजय निरूपम यांचा शिवसेनेवर घणाघात, म्हणाले…

काय लिहिले आहे पत्रात ?
“महाराष्ट्र सरकार योग्यरित्या काम करत नाही. सर्व काही अधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार केले जाते, मुकेश अंबानी यांच्यासारख्या मोठ्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित आहेत. तसेच, राज्यातील भ्रष्टाचार आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कमकुवत झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडणे, गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू, मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी सचिन वाझेंना झालेली अटक या सर्व प्रकरणांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गंभीर दखल घेत काही कठोर पावले उचलली आहेत. त्यामधील एक म्हणजे त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करून त्यांच्या जागी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांची नियुक्ती केली आहे. या सगळ्यानंतर विरोधी पक्ष भाजपने अधिक आक्रमक होत या बदल्या पुरेशा नसल्याचे म्हणत यामागे असणाऱ्या राजकीय शक्तींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

‘राजकीय हँडलर कोण, याचा शोध घेतला पाहिजे’
दोन दिवसांपूर्वी भाजपाकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत तर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. फक्त पोलीस आयुक्तांची बदली करून चालणार नाही तर सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे किंवा त्यांचे राजकीय हँडलर कोण, याचा शोध घेण्यात आला पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली तर या सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारपरिषदेद्वारे केली आहे. त्यानंतर आता नारायण राणे Narayan Rane  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Also read : 

‘अजानमुळे झोपमोड होते’; तक्रारीनंतर रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बंद !

हर्षवर्धन पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘वीज तोडणी मोहीम हे ‘महाविकास’चं अपयश’

त्यांच्या’ प्रामाणिकपणाला सलाम ! 10 वर्षे नगरसेवक, 5 वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष अन् आता करताहेत वॉचमनची नोकरी

नाराज असलेल्या वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंच्या ‘लेटर बॉम्ब’मध्ये परमबीर सिंह, माजी DGP जयस्वाल यांच्यावर आरोप; पोलीस दलात खळबळ, मुख्यमंत्री ठाकरेंना लिहीलं होतं पत्र

Gulabrao Patil : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ‘कोरोना’ पाँझिटिव्ह

रितिकाच्या आत्महत्येवर गीता फोगाट म्हणाली, ‘जिंकणं-हारणं हा तर खेळाडूच्या आयुष्याचा भाग’

IPL 2021 : ‘मुंबई इंडियन्स’ला मोठा फटका, पाकिस्तानमुळं वाढलं टेन्शन ! जाणून घ्या नेमकं प्रक

राष्ट्रवादीने केले CM उद्धव ठाकरेंचे समर्थन, म्हणाले – ‘वाझेंना सेवेत घेण्यासाठी फडणवीसांवर कोणाचाही दबाव नव्हता’

Related Posts