IMPIMP

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरात 6 दिवसात 4.80 रुपयांची दरवाढ

by nagesh
Petrol Diesel Price Hike Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा आलेख दररोज उंचच उंच जाऊ लागला असून त्यामुळे महागाई वाढू लागली आहे. तेल कंपन्यांनी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली आहे. (Petrol Diesel Price Hike Pune)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे शहरात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ८४ पैशांनी वाढ झाली आहे. पुण्यात आज पेट्रोलचा दर ११४.५३ रुपये लिटर इतका झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातही लिटरमागे ८४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पॉवर पेट्रोलचा दर ११९.०३ रुपये लिटर झाला आहे.

 

डिझेलच्या दरात प्रति लिटर ७२ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आता डिझेलचा दर ९७.२८ रुपये लिटर झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात डिझेलच्या दराने शंभरी पार केली होती. त्यावेळी दिवाळीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केंद्रीय करात कपात केल्याने डिझेलचा दर ९२.५० रुपये इतका कमी झाला होता. गेल्या आठवड्याभरात झालेल्या दरवाढीने आता तो ९७.२८ रुपये इतका झाला आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर एक एप्रिल रोजी डिझेलचा दर शंभरी गाठण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Petrol Diesel Price Hike Pune

 

हे देखील वाचा :

Maharashta School Update | विद्यार्थ्यांचं यंदाचं मामाच्या गावाला जायचं प्लॅनिंग लांबणीवर; शिक्षण विभागानं घेतला मोठा निर्णय

Chandrapur Crime | काय गुरुजी तुम्हीपण..! शिक्षकच निघाला गांजा तस्कर

Dilip Walse-Patil | मुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या कारभारावर नाराज?; दिलीप-वळसे पाटलांनी केला खुलासा

 

Related Posts