IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 52 नवीन रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | 12 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइन  – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या (Pimpri Corona) दैनंदिन रुग्ण संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. दैनंदिन आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे (Recover Patient) होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 52 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 47 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 52 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 78 हजार 523 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 47 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 74 हजार 368 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 367 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Pimpri Corona)

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि.23) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खाजगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 1156 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहरामध्ये 28 लाख 92 हजार 132 जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Pimpri Corona | 52 new corona patients diagnosed in Pimpri Chinchwad in last 24 hours; Learn other statistics

 

हे देखील वाचा :

Girls Marriage Age | …म्हणून केंद्र सरकारने घेतला मुलींच्या विवाहाचं वय वाढवण्याचा निर्णय

Wheatgrass-Reduce Uric Acid Levels | यूरिक अ‍ॅसिडचा स्तर कमी करण्यासाठी मदत करू शकते व्हीटग्रास, वेटलॉसमध्ये सुद्धा लाभदायक

Earn Money | नोकरी सोडून तुम्ही सुरू करू शकता ‘हा’ सुपरहिट बिझनेस, दरमहा आरामात होईल 5-10 लाखांची कमाई; जाणून घ्या कशी

 

Related Posts