IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 43 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Coronavirus | Coronas havoc Infection of 40 leaders including three Chief Ministers four Deputy Chief Ministers six Union Ministers

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरत आहे. शहरातील नवीन रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. तसेच बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही शहरासाठी दिलासादायक बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 43 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 43 नवीन रुग्ण (Pimpri Corona) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार 572 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 42 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 72 हजार 361 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरामध्ये सध्या 446 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात हद्दीबाहेरील 1 रुग्णांच्या मृत्यूची तर नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,496 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दिवसभरात 7,294 जणांचे लसीकरण

मंगळवारी (दि.09) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 07 हजार 294 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 23 लाख 62 हजार 312 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | Diagnosis of 43 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

या Multibagger Stock ने दिला 1100 टक्केपेक्षा जास्त नफा, 10 हजाराचे झाले 1.11 कोटी रुपये; जाणून घ्या

Faraz Malik | फडणवीसांच्या आरोपांवरून नवाब मलिकांच्या मुलाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले…

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; ‘द गेमचेंजर्स’ संघाचे सलग दोन विजय !

 

Related Posts