IMPIMP

Faraz Malik | फडणवीसांच्या आरोपांवरून नवाब मलिकांच्या मुलाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले…

by nagesh
Faraz Malik | NCP leader and minister nawab malik son faraz malik replied and gave explanation over bjp leader devendra fadnavis allegations

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Faraz Malik | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (मंगळवारी) राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर मोठा गौप्यस्फोट करत गंभीर आरोप केले. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून कवडीमोल दरात जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक (Faraz Malik) यांंनी फडणवीसांचे सर्व आरोप फेटाळून लावत प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

फराज मलिक (Faraz Malik) म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेले आरोप फेटाळून लावत सर्व व्यवहार कायदेशीर
असल्याचे नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांनी म्हटले आहे.
तर, देवेंद्र फडणवीस यांचे काम आरोप करणे आहे. ग्रीन झोनमध्ये हे नो डेव्हलपमेंट झोनमध्ये आहे. 70 टक्क्यांचे आरक्षण नाही.
तर 30 टक्क्यांचे आरक्षण आहे. जे अंडरवर्ल्डबाबत आरोप होतात ते चुकीचे आणि खोटे आहेत.
आता केंद्रीय तपास यंत्रणा येतील, तपास करतील. त्यांना आम्ही सगळे पुरावे दाखवू, सगळी कागदपत्रे आणि व्यवहार कायदेशीर आहे.
असं देखील फराज मलिक (Faraz Malik) यांनी सांगितलं आहे.

पुढे फराज मलिक यांनी म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस दावा करत आहेत की, ही जागा आम्ही सलीम पटेलकडून विकत घेतली.
तर 2005 मध्ये ते इथे 400 लोकांकडून भाडे वसूल करत होते. आमच्याकडे सगळे जुने पुरावे आहेत. सलीम पटेल हे आमचे त्या काळातील जागामालक होते.
हे सगळे 2007 ला दोषी आढळून आले आहेत. शाह वली खान अंडरवर्ल्डसाठी काम करतो हे आम्हाला माहितीच नव्हते.
त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. रेडी रेकनरच्या दराने ही जागा विकत घेतली. इथे 300 भाडेकरु आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून ते इथे राहतात. काही घरे अनधिकृतही आहेत. पण आम्ही त्यांना त्रास देत नाहीत. असं ते म्हणाले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Faraz Malik | NCP leader and minister nawab malik son faraz malik replied and gave explanation over bjp leader devendra fadnavis allegations

 

हे देखील वाचा :

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; ‘द गेमचेंजर्स’ संघाचे सलग दोन विजय !

Parambir Singh | परमबीर सिंग आणखी ‘गोत्यात’ ! अटकेतील महिला PI आशा कोरके आणि PI गोपालेचा धक्कादायक खुलासा

Nawab Malik | ‘आता CM आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का?’ BJP चा सवाल

 

Related Posts