IMPIMP

‘राजकारणासाठी माझ्या मुलीचे काहीही फोटो, व्हिडीओ दाखवले जात आहेत’ – पूजाचे वडील लहू चव्हाण

by sikandershaikh
pooja lahu chavan

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)टिक टॉकस्टार पूजा चव्हाण (pooja chavan) मृत्यूप्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा म्हणून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रान उठविले होते.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी अर्धा तास चर्चा झाल्यानंतर राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, पण ‘राठोड यांना राजीनामा देण्याची गरज नव्हती,’ असे पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी सांगितले आहे. याबाबत त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यात त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. लहू चव्हाण म्हणाले, “राजकारणासाठी माझ्या मुलीचे काहीही फोटो आणि व्हिडीओ दाखवले जात आहेत. तिने आत्महत्या केली हे मी अनेकदा सांगूनही राठोड यांना राजीनामा दयावा लागला.”

“पूजा चव्हाण (pooja chavan) मृत्यूप्रकरणात सरकार पोलिस प्रशासन, बलात्काराला वाचवतंय,” असा आरोप चित्रा वाघ यांनी नुकताच पत्रकार परिषदेत केला होता ‘राठोड यांना वाचविण्यासाठी महाविकास आघाडीने एकी केली आहे,’ असाही आरोप वाघ यांनी केला आहे. ‘माझ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात मला गुंतविण्याचा सरकारचा डाव आहे,’ असे वाघ यांनी सांगितले.

या प्रकरणात सर्व पुरावे असताना वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही.
घटनेच्या दिवशी 100 या क्रमांकावर फोन करून या प्रकरणाशी माझा काहीही संबध नाही, असे अरूण राठोडने पुणे पोलिसांनी सांगितले होते.
या दिवशी पोलिस कंट्रोलला गेलेल्या फोनची दखल का घेतली नाही, असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला आहे.

“मंत्रीमंडळातले सर्व मंत्री एकसारखे आहेत. सरकारमध्ये व्यभिचाऱ्याचे उदात्तीकरण सुरू आहे,
पूजा चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
पूजा चव्हाण (pooja chavan) मृत्यूप्रकरणी पुण्याच्या लष्कर न्यायालयात गुन्हा दाखल करण्याबाबतचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
लीगल जस्टीस सोसायटीतर्फे अॅड भक्ती पांढरे यांनी काल लष्कर न्यायालयात हा अर्ज केला आहे.

संजय राठोड उद्या देणार मंत्रिपदाचा राजीनामा; विदर्भातील आमदाराला मिळणार वन खातं ?

Related Posts