IMPIMP

PM Kisan Samman Nidhi Yojana | PM किसान योजनेचा 11 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार; कुणाला मिळणार नाही लाभ? जाणून घ्या

by nagesh
PM Kisan | story pm kisan released 13th installment of 2000 rupees soon beneficiaries check details

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन PM Kisan Samman Nidhi Yojana | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवली जात आहे. या योजने अंतर्गत सरकार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये रोख मदत पुरवते. ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना पाठवते. दरम्यान, या योजनेचा अकरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे समजते. परंतु, या योजनेच्या अटी व शर्तीनुसार अनेक शेतकऱ्यांना (Farmers) या योजनेचा लाभ मिळत नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

‘या’ शेतकऱ्यांना मिळत नाही लाभ –

– सर्व संस्थात्मक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

– जर तुमच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर शेतीयोग्य जमीन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही.

– कोणत्याही एक किंवा एकापेक्षा जास्त श्रेणीतील शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

– सध्या घटनात्मक पदावर असलेल्या किंवा भूतकाळातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळत नाही.

– लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद यांचे विद्यमान किंवा माजी सदस्य आणि महानगरपालिकेच्या माजी आणि विद्यमान महापौरांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

– केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त संस्थांचे सर्व वर्तमान आणि सेवानिवृत्त अधिकारी या योजनेचा लाभ घेत नाहीत.

– 10 हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक पेन्शन मिळवणाऱ्या सर्व सेवानिवृत्त पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, यामध्येही अनेक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आलीय. ज्या व्यक्तींनी गेल्या आर्थिक वर्षामध्ये आयकर भरला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. डॉक्टर, अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट आणि वास्तुविशारद यांसारख्या व्यावसायिकांनाही या योजनेचा लाभ मिळत नाही.

 

Web Title :- PM Kisan Samman Nidhi Yojana | pm kisan these people will not get the 11th installment see the full list

 

हे देखील वाचा :

Pune Metro | महामेट्रोची नवी ‘डेड लाईन’ ! 33.1 किमीचा मार्ग मार्च 2023 पर्यंत पूर्ण करणार

Sanjay Raut | महागाईच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांची भाजपवर टीका

Urfi Javed Instagram Video | उर्फी जावेदनं दोरीच्या साहाय्याने बांधले कपडे, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘थोडी लाज ठेव..’

 

Related Posts