IMPIMP

PM Narendra Modi | PM नरेंद्र मोदींनी Facebook, ट्विटरवरील फोटो केला चेंज

by nagesh
PM Narendra Modi | PM narendra modi changed his profile photo on twitter and facebook

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Narendra Modi | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवारी) आपला ट्विटर हॅन्डलवरील प्रोफाईल फोटो (Profile photo) चेंज केला आहे. त्याचबरोबर प्रोफाईल फोटो चेंज करुन त्यामध्ये भारताचे अभिनंदन, 100 कोटी लसीचे डोस पूर्ण झालेत. असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लिहिलं आहे. आतापर्यंत 100 कोटी भारतीय नागरीकांना कोरोना लसींचे (Corona vaccination) डोस देण्यात आले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

100 कोटी कोरोना लसीकरणांचा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज देशवासियांना संबोधित केलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आपल्या प्रोफाईल फोटोतून देशवासियांचं अभिनंदन करत आपल्या राष्ट्रध्वजाचे रंग तिंरगा देखील या फोटोमध्ये दिसतो आहे.
मोदी यांनी फेसबुक आणि ट्विटरवर त्यांचे प्रोफाईल फोटो बदलले आहे. या नव्या प्रोफाईल फोटोतून त्यांनी भारताचे अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी फोनवर ऐकायला येणारी कोरोनासंदर्भातली कॉलर ट्यून देखील चेंज केलीय. आता भारतीयांना लसीकरण मोहिमेचा यशस्वी मेसेज ऐकायला मिळणार आहे.

देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, काल भारताने 100 कोटी लसींची विक्रमी नोंद केली. आपल्या देशातील लोकांमुळे आपण हे यश मिळवलं आहे. मला सर्वांचे आभार मानायचे आहेत. भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची तुलना इतर देशांशी केली जात होती. हा एक बेंचमार्क आहे. तसेच, ‘लस संशोधन आणि विकास इतर देशांसाठी नवीन नाही. भारत इतर देशांकडून लस आयात करतो. सुरुवातीला प्रश्न उपस्थित केले जात होते की भारत या साथीचा सामना करू शकेल का? लसीकरण होईल का? पुरेसे पैसे असतील का? पण या 100 कोटींच्या आकड्याने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आता भारत एक सुरक्षित ठिकाण मानले जाईल. असं मोदींनी म्हटलं आहे.

 

Web Title :- PM Narendra Modi | PM narendra modi changed his profile photo on twitter and facebook

 

हे देखील वाचा :

MLA Rohit Pawar | ‘गिरीश महाजनांना पैशांचा घमंड, म्‍हणून फोडाफोडीचे राजकारण’ – रोहित पवार

PIB Fact Check | मोदी सरकार नव्या योजनेंतर्गत नागरीकांना देणार 4000 रुपये? जाणून घ्या सत्य

PM-Kisan New Rules | ‘पीएम शेतकरी सन्मान निधी योजने’च्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या

 

Related Posts