IMPIMP

PMSYM Yojana | PM श्रम योगी मानधन योजनेंतर्गत निवृत्तीनंतर दरवर्षी मिळेल भरघोस पेन्शन; जाणून घ्या योजना

by nagesh
RTI | up maharashtra and bengal also become the highest premium paying state under atal pension yojana

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन PMSYM Yojana | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) अनेक लाभदायक योजना राबवत असते. त्यामधील एक म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PMSYM Yojana) आहे. ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी चांगली योजना आहे. या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी निगडित अशा अनेक कामात गुंतलेल्या मजुरांना त्यांचे वृद्धापकाळ सुरक्षित ठेवण्यास मदत केली जातेय. या योजने अंतर्गत पेन्शनची (Pension) हमी सरकार देते. या योजनेत तुम्ही दररोज केवळ दोन रुपये वाचवून वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन मिळवू शकणार आहात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PMSYM Yojana) ही शेतकरी आणि कामगारांसाठी पेन्शन योजना आहे, ज्याच्या अंतर्गत लाभार्थीला 60 वर्षांनंतर वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन दिली जातेय. दरम्यान, ही योजना सुरू केल्यावर तुम्हाला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील. अर्थात, 18 व्या वर्षी दररोज 2 रुपये वाचवून तुम्हाला वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. यानंतर तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळेल. 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये मिळतील.

 

हे कागदपत्रे लागतील –

बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
तसेच व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

 

पात्रता काय असेल ?

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजनेअंतर्गत कोणताही असंघटित क्षेत्रातील कामगार, ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे आणि कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नाही, तो लाभ घेऊ शकतो. लक्षात घ्यायचे की या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असावे.

दरम्यान, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये योजनेसाठी नोंदणी करावी लागणार आहे. कामगार सीएससी केंद्रात पोर्टलवर स्वत:ची नोंदणी (Registration) करू शकतात. तसेच, सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टल तयार केले आहे. या केंद्रांच्या माध्यमातून ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल. त्याचबरोबर, नोंदणीसाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर आवश्यक असेल. तसेच, संमतीपत्र द्यावे लागेल जे कामगाराचे बँक खाते असलेल्या बँकेच्या शाखेतही द्यावे लागणार आहे, जेणेकरून त्याच्या बँक खात्यातून पेन्शनसाठी वेळेत पैसे कापता येतील.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

टोल फ्री क्रमांक –

या योजनेसाठी कामगार विभाग, एलआयसी, ईपीएफओ यांचे कार्यालय श्रमिक सुविधा केंद्र बनवण्यात आले आहे.
तसेच, टोल फ्री क्रमांक – 18002676888

 

Web Title :- PMSYM Yojana | pm shram yogi mandhan yojana how to do registration eligibility and all other important things to know

 

हे देखील वाचा :

Pregnant Woman Diet | प्रेग्नंट महिलांनी 1 ते 9 व्या महिन्यापर्यंत काय खावे? आयुर्वेदात ‘हे’ आहेत परफेक्ट डाएट

Presidential Election 2022 | राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत अभिजित बिचुकलेंची एन्ट्री; खासदार-आमदाराबरोबर संपर्क वाढवला

Egg Combination | अंडे खाताना सोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ 5 गोष्टी, शरीरासाठी धोकादायक कॉम्बिनेशन

 

Related Posts