IMPIMP

Presidential Election 2022 | राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत अभिजित बिचुकलेंची एन्ट्री; खासदार-आमदाराबरोबर संपर्क वाढवला

by nagesh
Presidential Election 2022 | abhijit bichukale is interested in presidential election india he is in contact with mp mla

सरकारसत्ता ऑनलाइन – Presidential Election 2022 | राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections) झाल्यानंतर आता राष्ट्रपती पदाच्या
निवडणुकीची (Presidential Election 2022) चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चांच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र
आता असं एक नाव समोर आल आहे की, ती व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी इच्छुक आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिजित बिचुकले (Abhijit
Bichukle) आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एका वृत्तपत्राशी संवाद साधताना बिचुकले म्हणाले, “हे खरं आहे की मी राष्ट्रपती पदासाठी इच्छुक आहे. सध्या मी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही आमदार, खासदारांबरोबर सह्या देण्यासंदर्भात बोलत आहे. मी बहुजन समाजातील असून अतिशय निर्व्यसनी, सुशिक्षित आणि कायद्याची माहिती आहे. याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सांगितलं होतं. परंतु, ऐनवेळी त्यांनी कोणीतरी कोविंद साहेब शोधून आणले. त्यांना राष्ट्रपती केलं. बहुमतामुळे त्यांना ते जमले,” असे ते म्हणाले. (Presidential Election 2022)

 

“आपल्या न्याय पालिका असतील, केंद्रातील निर्णय असतील, त्या सिस्टीम राष्ट्रपती पदासाठी जी ताकद आहे. या सगळ्या ताकद राष्ट्रपती पदाखाली येतात. राष्ट्रपतींनी बऱ्याच गोष्टी देशासाठी करायच्या आहेत. पण त्या करत नाहीत, म्हणून मी देशातील आमदार, खासदार यांच्याशी बोलतोय. सध्या कोल्हापूर, सांगली आणि पुण्यातील खासदारांशी चर्चा सुरू आहे. अर्जावर अनुमोदन करण्याची संख्या मिळाली तर 100 टक्के माझा अर्ज जाणार. जोपर्यंत मी अर्ज भरत नाही तोपर्यंत मला हे गुपित ठेवायचं होतं,” असंही बिचुकले म्हणाले.

 

“आमदार, खासदारांचे अनुमोदन मिळवणं हे अवघड आहे. ते पक्षाशी बांधील असतात. त्यांना व्हीप असत.
चमचेगिरी करण्यात पटाईत आहेत. जर मी हा अर्ज भरण्यात यशस्वी झालो तर पुढच्या राजकारणापासून मी लांब गेलो नाही.
असे सांगतानाच राष्ट्रीय राजकारणात मी आहेच असंही त्यांनी सांगितलं.
आपले पंतप्रधान हे चहावाले, मी पेढेवाला हा मोठा फरक आहे. त्यांना कौटुंबिक जीवनातलं काही माहिती नाही.
घरही चालवायचं माहिती नाही. पंतप्रधान होतात ते संविधानामुळेच. ते संविधान मला लढण्याची शक्ती देत. त्यामुळे मी लढत राहणार,” असेही बिचुकले म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Presidential Election 2022 | abhijit bichukale is interested in presidential election india he is in contact with mp mla

 

हे देखील वाचा :

Egg Combination | अंडे खाताना सोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ 5 गोष्टी, शरीरासाठी धोकादायक कॉम्बिनेशन

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांचा किमान पगार होईल 26000 रूपये, फिटमेंट फॅक्टर वाढल्याने वाढेल वेतन

WhatsApp New Features | आता व्हॉट्सअ‍ॅपवर कॅप्शनसहीत फोटो फॉरवर्ड करता येणार; जाणून घ्या सोपी पद्धत

 

Related Posts